शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

घाटशिरस येथील बोगस डॉक्टरच्या रुग्णालयावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 3:14 PM

पोलिसांनी बोगस डॉक्टर सुमित बिश्वास यास ताब्यात घेतले

पाथर्डी : तालुक्यातील घाटशिरस येथे तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस यांनी संयुक्तपणे एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली. यावेळी राबविलेल्या छापा सत्रात रुग्णालयातील औषधाचा साठा हस्तगत केला असून बोगस डॉक्टर सुमित बिश्वास यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.घाटशिरस येथे गेल्या अनेक दिवसापासून वैद्यकीय व्यवसाय करणारा सुमित बिश्वास हा बोगस डॉक्टर गावात राहत्या घरातील दवाखान्यातून अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय चालवत असल्याबाबत बोगस डॉक्टर तालुका शोध पथकांला माहिती मिळाली होती. त्याच अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.भास्कर लाखुळे, आरोग्य सेवक जायभाय, हरिष शेळके, आरोग्य सेवक धर्मनाथ पालवे, पोलीस कॉ. देविदास तांदळे यांनी बोगस डॉक्टर शोध समिती अध्यक्ष तथा गटविकास अधिकारी जगदीश पालवे व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सोमवारी सकाळी अचानक छापा टाकला असता सुमित बिश्वास हा परप्रांतीय बोगस डॉक्टर बेकायदेशीररित्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले.सुमित बिश्वास याने भरारी पथकाला पाहताच दवाखान्याच्या मागच्या दाराने धूम ठोकली, परंतु पथकाने बिश्वास याला पाठलाग करून पकडले आहे. अवैधरित्या दवाखाना सुरु असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, सुया, औषधांचा मोठा साठा आढळून आला असून पथकाने पंचनामा करून सदर औषध साठा जप्त करून बोगस डॉक्टर सुमित बिश्वास याच्याविरुद्ध समितीने फिर्याद नोंदविण्याचे काम सुरु केले आहे.ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब अशिक्षित व अज्ञानी लोकांच्या अडाणी पणाचा गैरफायदा घेऊन तथाकथित बोगस डॉक्टरांनी मोठी माया जमविण्याचे काम सुरु केले असून यापूर्वी गुन्हे दाखल असतानाच नावे बदलून पुन्हा त्याच बोगस डॉक्टरांनी व्यवसाय सुरु केल्याने प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.वैद्यकीय व्यवसायाचा परवाना असल्याशिवाय औषधे पुरविण्यात येऊ नये असा नियम असताना या बोगस डॉक्टरला कोणी औषधे पुरवली याचा शोध घेऊन त्यांच्यावर देखील कार्यवाही करणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी