प्लॅस्टिक पिशवीत अनामत रक्कम आणली; नेवाशातील उमेदवाराला पाच हजाराचा दंड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 02:48 PM2019-09-30T14:48:21+5:302019-09-30T14:55:30+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला. सोमवारी (दि.३०) दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडला.

Plastic bag brought in deposit; Nevasha candidate fined five thousand | प्लॅस्टिक पिशवीत अनामत रक्कम आणली; नेवाशातील उमेदवाराला पाच हजाराचा दंड 

प्लॅस्टिक पिशवीत अनामत रक्कम आणली; नेवाशातील उमेदवाराला पाच हजाराचा दंड 

googlenewsNext

नेवासा : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रूपयांचा दंड भरावा लागला. सोमवारी (दि.३०) दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडला.
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच प्लॅस्टिक बाळगल्याने अशी कारवाई झाल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजाराची चिल्लर आणली होती. त्यामध्ये पाचशे रूपयाचे वीस बंडल प्लॅस्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लॅस्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लॅस्टिकमध्ये आणल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आले. त्यांनी मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावला.
यावेळी दंड भरताना एक हजाराची चिल्लरसह पाच हजार रुपये भरून दंडाची पावती व उमेदवारी अर्ज भरताना एक हजाराच्या चिल्लरसह दहा हजाराची अनामत रक्कम मुंगशे यांना भरावी लागली. नेवासा येथे नगरपंचायत आहे. नगरपंचायत असूनही येथे प्लॅस्टिकविरोधी फारसी कारवाई झालेली नाही. मात्र आजच्या या कारवाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

Web Title: Plastic bag brought in deposit; Nevasha candidate fined five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.