दानशूर व्यक्तींनी कोविड केअर सेंटरला मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST2021-04-11T04:21:30+5:302021-04-11T04:21:30+5:30
नेवासा : कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटरमधील सुविधेवर मर्यादा येत आहेत. बेड, गॅस सिलेंडर, मास्क, ...

दानशूर व्यक्तींनी कोविड केअर सेंटरला मदत करावी
नेवासा : कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटरमधील सुविधेवर मर्यादा येत आहेत. बेड, गॅस सिलेंडर, मास्क, सॅनिटायझर यासारख्या वस्तूंची गरज भासत असल्याने दानशूर व्यक्तींनी शासकीय कोविड केअर सेंटरमधील पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सढळ हाताने मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी केले.
तालुक्यातील भेंडा येथील श्री संत नागेबाबा भक्तनिवासामध्ये सुरू असलेल्या शासकीय कोविड केअर सेंटरसाठी पंचगंगा सिड्सने १०० बेड दिले. पंचगंगा सिड्सचे संचालक काकासाहेब शिंदे यांनी भेंडा येथे तहसीलदार सुराणा यांच्याकडे १०० बेड सुपुर्द केले.
यावेळी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, डॉ. भाग्यश्री सारूक, डॉ. योगेश साळुंके, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे उपस्थित होते. भेंडा कोविड सेंटरमध्ये १६२ रुग्ण उपचार घेत आहेत. काही रुग्णांना बेड शिल्लक नव्हते. ही अडचण ओळखून शिंदे यांनी १०० बेड दिले आहेत. त्यामुळे येथील एकूण बेड संख्या २५० इतकी झाली आहे.