पवार साहेबांमुळे राजकारणात आले : आदिती तटकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:35 PM2020-01-17T13:35:29+5:302020-01-17T13:36:34+5:30

नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे.  लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर्वच पिढ्यांमध्ये संवाद साधण्याची कला आहे, असे मत राजशिष्टाचार मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. 

Pawar got into politics due to Saheb: Aditi Tatkare | पवार साहेबांमुळे राजकारणात आले : आदिती तटकरे 

पवार साहेबांमुळे राजकारणात आले : आदिती तटकरे 

googlenewsNext

संगमनेर : नेता होणे असं कधी ठरवले नव्हते. वडील राजकारणात आहेत. शरद पवार यांच्यासारखे नेतृत्व तरुणांना आपले वाटणारे नेतृत्व आहे.  लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाहून राजकारणात येण्याचा विचार केला. पवार साहेबांमुळे यांच्यात सर्वच पिढ्यांमध्ये संवाद साधण्याची कला आहे, असे मत राजशिष्टाचार मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले. 
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या 'मेधा २०२० युवा संस्कृतीत महोत्सवा'त संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्यमंत्री अदिती तटकरे बोलत होत्या.
तटकरे म्हणाल्या, महिलांना महिलांची खाती मिळते. हा समाज महाविकास आघाडी सरकारमध्ये खोटा ठरला आहे. राज्यातील गड किल्ल्यांचे संरक्षण करणार आहे. गायक अवधूत गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
सर्वात अवघड परीक्षा ही निवडणूक असते. घराणेशाहीमुळे राजकारणात यशस्वी होताच येते असे नाही. प्रत्येक गोष्ट शिकावीच लागते. घराणेशाहीचा शिक्का लावलाच जाणार आहे. पण आम्हाला पाच वर्षात कामच करावे लागणार आहे. त्यानंतर आम्हाला म्हणता येईल, की करून दाखवले, असेही त्या म्हणाल्या. 
 

Web Title: Pawar got into politics due to Saheb: Aditi Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.