रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:35 PM2020-09-16T12:35:56+5:302020-09-16T12:36:36+5:30

महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा गाजवणारे प्रशांत तसे उत्तम आणि दर्जेदार कलेचा आग्रह करतात. ताटी उघड़ा ज्ञानेश्वरा, जानता राजा या  महानाट्या मधे त्यांचा समावेश होता. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेणारे प्रशांत गेली 20 वर्ष गणेशोत्सवात आरास ची प्रकाश योजना करतात. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या सज्ञापन विभागातील अनेक लघुपटात त्यांनी भूमिका केली आहे. नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या पिस्तुल्या मधे ते प्रमुख भूमिकेत होते तर फेंड्री,  गुगलगाव,गणवेश हे चित्रपट तसेच दक्षता,क्राइम डायरी या मालिकेतही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

Pandya lost on stage; Veteran painter Prashant Kamble passes away | रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन 

रंगमंचावरील पांड्या हरपला; ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन 

Next

अहमदनगर: येथील ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत कांबळे यांचे निधन झाले. त्यांचा लोकमतच्या नट बोलट सदरात प्रसिध्द झालेला हा लेख

 *नट-बोलट* 

आजी,आजोबा,आई ,वडील, काका यांना नाटक सिनेमा पाहाण्याची मोठी हौस,संगीत नाटक असो की हौशी स्पर्धा हे कुटुंब आवर्जून हजेरी लावनार, याच कुटुंबात जन्मलेले प्रशांत कांबळे यांना लाहणपना पासून नाट्य सांस्कृतिक क्षेत्राची आवड़ निर्माण झाली. दादा चौधरी शाळेत स्नेहसम्मेलनात त्यांनी प्रथम भाग घेतला आणि प्राथमिक शिक्षक श्याम जोशी यांनी त्यांच्या वर नाट्य संस्कार केले. 

 

नट हा त्याच्या कलाकृतिने ,संवादाने, अभिनयाने ओळखला जातो. *अभ्रान* नावाच्या एकांकीकेत प्रशांत यांच्या तोंडी *पांडुरंग पांडुरंग* असे संवाद होते. त्यांनी भूमिका छान सादर केली. नाट्यकर्मी सतीश लोटके यांच्या आईला सुभद्रा लोटके यांना ही भूमिका खुप आवडली.  पण कलाकाराचे नाव माहीत नसल्यामुळे त्या प्रशांत यांना पांडु म्हणून हाक मारित पुढे पांडुचा पांड्या झाला आणि सर्व नाट्य क्षेत्र त्यांना याच नावाने ओळखू लागले. माझ्या कलाकृतिने मला हे नाव दिले म्हणत त्यांनीही हे नाव स्विकारले.

 

४० वर्ष रंगभूमिशी जोड़ला गेलेले हे कलाकार आजही नाविन्याच्या शोधात असतात, नाटक हा त्यांचा श्वास आहे. अभिनय,दिग्दर्शन,प्रकाश योजना,नेपथ्य, संगीत या सर्वच विभागात त्यांची प्रचंड हुकूमत आहे. नाटका आपलें असो किंवा दुस-याचे प्रशांत प्रत्येकाला मदत करताना दिसतात. जेव्हा मला नाटकातले फार ज्ञान नव्हते त्यावेळी २६ वर्षापुर्वी  कोणतीही ओळख नसताना माझ्या ब्रम्हदेवाची घटना दुरुस्ती या नाटकाची प्रकाशयोजना प्रशांत यांनी केली होती. शिवाय प्रत्येक कलाकाराला सूचना आणि मार्गदर्शन करीत होते. अश्या अनेक संस्था आणि कलाकारांना त्यांनी प्रोत्साहन दिले आहे

 

नाटक जगणं म्हणजे क़ाय हे प्रशांत यांच्यांकड़ून शिकन्या सारखे आहे. राज्य नाट्य स्पर्धेत अंतिम फेरी मधे *याचक आणि तर्पण* या नाटका साठी त्यांना रौप्य पदक मिळाले आहे. सतीश लोटके यांच्या दिग्दर्शना खाली थेंब थेंब आभाळ, अभ्रान मधे त्यांनी प्रभावी भूमिका केली होती. श्याम शिंदे यांच्या *मन धुव्वधार,थैंक्यू मिस्टर ग्लैड,नीरो,हमीदाबाइची कोठी,कोलाज,तर्पण, मृत्युछाया,याचक,तीर्थरूप चिरंजीव,अग्निवेश* या नाटकात त्यांच्या भूमिकेची विविधता पाहाता नवींन पीढ़ीला शिकन्या सारखे खुप काही होते. 

 

हौशी रंगभूमिवर नाट्य संस्थाना अनेक अडचणी येतात त्या ठिकाणी प्रशांत नेहमीच मदतिला धावून आले आहेत. मी दिग्दर्शित केलेल्या अम्युझमेन्ट पार्क ला त्यांनी प्रकाश योजना केली तर शेवंता जित्ति हाय मधे,अनंत जोशी यांच्या  सांबरी नाटकात भूमिका केली आहे. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालाय मुंबई आयोजित प्रयोगसिद्ध कला यांचे महत्वपूर्ण प्रशिक्षण जेष्ठ नाट्यकर्मी जयदेव हट्टनगड़ी यांच्या मार्गदर्शना खाली   प्रशिक्षण घेतले आहे.

 

चौफेर,बहुआयामी,अष्टपैलु या उपाधी ज्याना तंतोतान्त लागू होतात असे प्रशांत यानी *रंग उमलत्या मनाचे,डॉ हुददार, हातचा एक,अंदमान, कोलाज*  या सह अनेक मराठी हिंदी नाटक एकांकिका ला संगीत दिले,कधी प्रकाश योजना तर अनेक नाटकांचे नेपथ्य केले, राज्य नाट्य स्पर्धा,भाईंदर रंगभूमि,महापौर करंडक नगर,नाट्य परिषद ,थियटर अकैडमी, या सह राज्यातील अनेक स्पर्धेत परितोषिके पटकावली आहेत.

महाविद्यालयीन काळात अनेक स्पर्धा गाजवणारे प्रशांत तसे उत्तम आणि दर्जेदार कलेचा आग्रह करतात. ताटी उघड़ा ज्ञानेश्वरा, जानता राजा या  महानाट्या मधे त्यांचा समावेश होता. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढाकार घेणारे प्रशांत गेली 20 वर्ष गणेशोत्सवात आरास ची प्रकाश योजना करतात. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या सज्ञापन विभागातील अनेक लघुपटात त्यांनी भूमिका केली आहे. नागराज मंजुळे यांच्या गाजलेल्या पिस्तुल्या मधे ते प्रमुख भूमिकेत होते तर फेंड्री,  गुगलगाव,गणवेश हे चित्रपट तसेच दक्षता,क्राइम डायरी या मालिकेतही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

सध्या अपूर्व मेघदूत या व्यावसायिक प्रयोगाची ते प्रकाश योजना सांभाळत आहेत. नगर मधील जेष्ठ रंगकर्मी,बरोबरीचे रंगकर्मी आणि नवोदित कलाकार या तिन्ही पीढ़ी बरोबर ते काम करतात यातच त्यांचा आवाका दिसून येतो. कायद्याच्या अभ्यासक्रम अर्ध्या वर सोडून ते नाटकात रमले,वीडियो फोटोग्राफी हा व्यवसाय स्वीकारला स्वभाव स्पष्ट परखड़ असल्या मुळे त्यांच्या कड़े अगोदर कोणी फिरकत नाही पण एक सच्चा कलाकार त्यांच्यात दिसतो तेव्हा अनेकांचे ते जिवलग मित्र होतात.रितेश सालुंके ,मी आणि प्रशांत नाट्य चर्चे साठी रात्र रात्र जागलो आहोत.पहाटे 3 असो की 5 वाजलेले असो फोन करून नाटका वर बोलायचे आहे असे म्हणणारे हे अवलिया व्यक्तिमत्व.

आई उर्मिला वडील शितकान्त वामन ,काका अरुण वामन,

आजोबा वामन रामचंद्र

 आजी ताराबाई यांच्या नाट्य सांस्कृतिक वेडा मुळे माझ्यात ते गुण आले त्यांचे आशीर्वाद आणि मित्रांचे सहकार्य म्हणून मी नाट्य जीवन जगत असे प्रशांत सांगतात.

  - शशिकांत नजान

Web Title: Pandya lost on stage; Veteran painter Prashant Kamble passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.