अहमदनगर : शहरातील माळीवाडा बसस्थानक जिल्हा परिषद गेट येथे अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप व संघटनेचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर, प्रमुख सल्लागार विलास कराळे, ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, वरिष्ठ उपसंपादक सुदाम देशमुख, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कामगार नेते भाऊसाहेब भाकरे, गणेश आटोळे, सागर बिडकर, नीलेश कांबळे, संतोष भिंगारदिवे, शंकर गोरे, गणेश ढाणे, लतीफ शेख, पोपट कराळे, धमक गायकवाड, आतीब खान, राहुल अनभुले, पोपट कांडेकर, गणेश नवले, नासीर खान, जमीर शहा, जुबेर शेख, मतीन शेख, हर्षद सय्यद, नितीन जाधव, मुन्ना परदेशी आदी उपस्थित होते.
.........................
फोटो
शहरातील माळीवाडा बसस्थानक येथे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक-मालक संघटनेच्यावतीने रिक्षा थांबा व पाणपोईचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांनी केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, सरचिटणीस अशोक औशीकर, प्रमुख सल्लागार विलास कराळे आदी उपस्थित होते.