अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:14 AM2021-02-19T04:14:00+5:302021-02-19T04:14:00+5:30

थकीत वीज बिलापोटी खंडित केलेल्या ट्रान्सफार्मरचा वीज पुरवठा सुरळीत करावा. वीज बिलासाठी होणारी सक्तीची वसुली थांबवावी अन्यथा गुरूवारी २५ ...

Otherwise let's do Rasta Rocco movement | अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू

अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू

Next

थकीत वीज बिलापोटी खंडित केलेल्या ट्रान्सफार्मरचा वीज पुरवठा सुरळीत करावा. वीज बिलासाठी होणारी सक्तीची वसुली थांबवावी अन्यथा गुरूवारी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नगर-मनमाड राज्यमार्गावर सर्व शेतकरी बांधव व वीज कंपन्यांच्या वसुलीस कंटाळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. उपलब्ध शेतमालाला योग्य तो भाव नसल्याने अत्यंत कमी किमतीत विक्री करावी लागली. अशा परिस्थितीत गेली वर्षभर जनतेला पोट भरणेही मुश्किल झाले. ग्रामीण भागात १६ तास भारनियमन असते. उर्वरित राहिलेल्या ८ तासातही वीज अनेकवेळा बंद असते. जळालेल्या ट्रान्सफार्मरची महावितरणकडून आधी बिले भरा मगच ट्रान्स्फार्मर दुरूस्ती केली जाईल, असे सांगितले जाते. शेतकऱ्यांचे चालू ट्रान्सफार्मर थकीत वीज बिलासाठी बंद करत आहेत.

राज्यातील सर्व शेतकरी, घरगुती व व्यापारी वर्गाचे लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांचे जळालेले ट्रान्सफार्मर त्वरित दुरूस्ती करून मिळावी. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

निवेदनावर वंचित बहुजन आघाडी उपजिल्हाध्यक्ष अरूण डोंगरे, तालुकाध्यक्ष अनिल जाधव, बाबासाहेब मकासरे, जगन्नाथ बाळाजी गायकवाड, प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रशांत मधुकर पवार, विक्रम गाढे आदींच्या सह्या आहेत.

..............

१८ राहुरी वंचित

Web Title: Otherwise let's do Rasta Rocco movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.