The ordeal of Corona's death continues | कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच

कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच

अहमदनगर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, रविवारी दिवसभरात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. विद्युतदाहिनीबाहेर १७ मृतदेहांवर सायंकाळी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाने शहरासह जिल्ह्यात कहर माजविला आहे. मृतांचा आकडा जिल्ह्याची चिंता वाढविणारा आहे. गेल्या गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत कोरोनाने १०० जणांचा बळी घेतला. रविवारी दिवसभरात पुन्हा मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला. जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसभरात ३९, तर खाजगी रुगणालयांत मृतांची संख्या ५ इतकी आहे. त्यापैकी ३७ जणांवर अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आले असून, उर्वरित सात जणांवर दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले. अमरधाम येथे विद्युतदाहिनीत दिवसभरात २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित १७ जणांवर एकाचवेळी विद्युतदाहिनीबाहेर अंत्यविधी करण्यात आला.

Web Title: The ordeal of Corona's death continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.