शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करतात- मधुकरराव पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 5:00 PM

आपणही तालुक्यात विविध विकासकामे केली. अजूनही छोटे मोठे बंधारे बांधणे बाकी आहे. युवकांच्या हाताला काम द्यायचे आहे. विकास कामांतून तालुका बांधणीचे काम आपण करत आहोत. मात्र विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केला.

राजूर : आपणही तालुक्यात विविध विकासकामे केली. अजूनही छोटे मोठे बंधारे बांधणे बाकी आहे. युवकांच्या हाताला काम द्यायचे आहे. विकास कामांतून तालुका बांधणीचे काम आपण करत आहोत. मात्र विरोधक केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजीमंत्री मधुकरराव पिचड यांनी केला.अकोले मतदार संघातील वारंघुशी येथे मंगळवारी सायंकाळी महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांच्या प्रचारसभेत माजीमंत्री पिचड बोलत होते. आरपीआयचे भाई पवार अध्यक्षतेखाली सभा झाली. पिचड म्हणाले, सत्तेच्या विरोधात असताना आमदार वैभवने तालुक्याचा विकास प्रश्नावर आंदोलने केली. आपण विकासाच्या बाजूने म्हणजेच भाजपमध्ये प्रवेश केला.  आपण आमदार झालो. त्यावेळी अकोल्यापर्यंत डांबरी रस्ता होता व वीजही तेथपर्यंतच होती. आपल्या कार्यकाळात वाडी वस्त्यांपर्यंत रस्ते,वीज पोहोचली. मुलांच्या शिक्षणासाठी शाळा, आश्रमशाळा, इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळा सुरू केल्या. आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट तयार केले. तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून पर्यटन विकास राबविला. याच पर्यटन विकासाला चालना मिळाल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचा शब्द घेतला.  दोन वर्षांत सर्व रस्ते, घरकुले कामे पूर्ण करणार. पिंपरकणे येथील उड्डाणपुलाचे काम एक वर्षात पूर्ण करून पर्यटनाला चालना देण्यासाठी निधीची तरतूद करणार आहे. सदाशिव घाणे, पंचायत समिती सदस्य उर्मिला राऊत, उपसरपंच अनिता कडाळी, राजू मधे, मान्हेरेचे सरपंच हरिभाऊ गभाले, सुरेश भांगरे,  माधव गभाले, विजय भांगरे, डॉ. विजय पोपरे, भरत घोरपडे, ज्ञानेश्वर झडे, काशिनाथ भडांगे, भास्कर एलमामे, भोरू खाडे, गणपत देशमुख, मुरलीधर भांगरे उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश पवार यांनी केले. आभार भरत घाणे यांनी मानले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019