शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सरकारच्या कामकाजावर पूर्णत: समाधानी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:20 PM

निलम गो-हे: सेनेतून जे बाहेर गेले ते एकटे पडले

अहमदनगर : विविध प्रश्नांमुळे राज्यातील सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे़ नोटाबंदीचा मूळ उद्देश सफल झालेला नाही़ महागाई वाढत आहे़ त्यामुळे सरकारच्या कामकाजाबाबत शिवसेना पूर्णत: समाधानी नाही़ असे मत शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ़ निलम गो-हे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़गो-हे म्हणाल्या राज्यात १९९५ साली सेना-भाजपाचे सरकार होते़ आज मात्र परिस्थती तशी नाही़. निवडणुकीत सेना-भाजपा स्वतंत्र लढले़ सरकारमध्ये सहभागी असलो तरी जनतेच्या प्रश्न सोडविण्यासाठी ठाम भूमिका घेतली जाते़ सेना सरकारमधून बाहेर पडली तर शिवसेनेचे आमदार फुटतील असा राजकीय संभ्रम विरोधकांकडून निर्माण केला जात आहे़ सेनेतून बाहेर गेलेले पुन्हा सेनेत आले़ ते बाहेर राहिले ते एकटे पडले़ असे सांगत गो-हे म्हणाल्या गेल्या गेल्या १७ वर्षांत नगर जिल्ह्यात कोठेवाडी ते कोपर्डी या प्रकारणाच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना  घडल्या आहेत़ अशा घटनांनंतर आरोपी पकडले जातात़ त्यांच्या शिक्षा होते़ मात्र आरोपीला वरिष्ठ न्यायालयात जाण्याची संधी असल्याने त्यामुळे शिक्षेला विलंब होतो़ त्यामुळे अशा अत्याचाराच्या घटनांसाठी जलदगती न्यायालयाची निर्मिती करणे गरजेचे असून, याबाबत विधानपरिषदेत आवाज उठविणार आहे़ शासकीय सेवे कार्यरत असलेल्या महिलांबाबत अत्याचार अथवा हिंसक घटना घडली़ तर त्यांना शासकीय सुविधा देणे गरजेचे असून, याबाबतही पाठपुरावा करणार आहे़ बालन्यायालयात मुलांना भितीदायक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी तेथील अंतर्गत रचना बदलणे गरजेचे आहे़ राज्यात २०१४ पूर्वी गुन्हेगारी घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाणे अवघे साडेतीनटक्के होते़ सध्या मात्र हे प्रमाण ५७ टक्के आहे़ पोलीसांनी संवेदनशीलपणे काम केले तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल़ पीडित महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून नयेत़ असे आव्हान गो-हे यांनी केले़

 ‘त्या’ बालिकेसाठी विशेष सरकारी वकिलाची मागणी करणारनगर येथील रेल्वेस्टेशनवर अडिच वर्षाच्या बालिकेवर अत्याचाराची घटना घडली होती़ याबबात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे़ हा खटला प्रभावीपणे लढवून आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विशेष सरकारी वकिल देण्याची मागणी करणार आहे़ तसेच नगर येथे कौटुंबिक न्यायालयाचे कामकाज तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेगो-हे यांनी सांगितले़