ना सुट्टी, ना कामांचा कंटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:19 AM2021-04-24T04:19:52+5:302021-04-24T04:19:52+5:30

आरोग्य केंद्रांचे कामकाज सांभाळून फोन येईल, तिकडे जाऊन कोरोना रुग्णांची सेवा करणे व वेळेत उपचार मिळविण्यासाठी झटत राहणे हिच ...

No vacation, no boredom | ना सुट्टी, ना कामांचा कंटाळा

ना सुट्टी, ना कामांचा कंटाळा

googlenewsNext

आरोग्य केंद्रांचे कामकाज सांभाळून फोन येईल, तिकडे जाऊन कोरोना रुग्णांची सेवा करणे व वेळेत उपचार मिळविण्यासाठी झटत राहणे हिच त्यांची दिनचर्या बनली आहे. आरोग्य अधिकारी म्हणून गिरीश दळवी केडगावकरांची आरोग्य सेवा करीत आहेत. त्यांच्या सोबतीला १६ जणांची टीम त्यांच्यासोबत कोरोनाचे आक्रमण थोपविण्यासाठी लढत आहेत. केडगावमधील आतापर्यंतची रुग्णसंख्या जवळपास ४ हजारांच्या पुढे गेली आहे. पाचशेपेक्षा जास्त सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य केंद्रात लसीकरण व कोरोना चाचणीचे कामकाज सुरू आहे.

केडगाव केंद्रात रोजच्या २५० तपासण्या केल्या जातात. त्यातील बाधितांना योग्य उपचारासाठी मार्गदर्शन करून त्यांना कोविड सेंटरमध्ये ते स्वत: पाठवितात. कोविड सेंटरमध्ये जाऊन स्वत सर्व रुग्णांची तपासणी करून आवश्यक ते उपचार करण्याचे काम ही ते आपुलकीने करीत आहेत.

...

वर्षभर सुट्टी नाहीच

नगरमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून दळवी यांचे सुरू झालेले काम अद्याप अविरत सुरू आहे. सुरुवातीला मुकुंदनगरच्या कंटेन्मेंट झोनमध्ये त्यांनी आरोग्यसेवा केली. तेव्हापासून सुट्टी न घेता, ते सतत कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना व नागरिकांना पाठबळ देत आहेत.

...........

सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. कामाचा प्रचंड ताण आहे. मात्र, रुग्णांची सेवा करण्यासाठी कधीच थकवा येत नाही. काम करण्यासाठी रोज प्रोत्साहन मिळते. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवस रात्र काम करण्यावर भर आहे.

- डॉ.गिरीश दळवी (आरोग्य अधिकारी, केडगाव केंद्र)

Web Title: No vacation, no boredom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.