पिकांना हमीभाव नाही, शेतीला पाणीही नाही.. राज्यमंत्री तनपुरेंकडे शेतकऱ्यांनी व्यक्त केली खदखद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 03:53 PM2020-07-05T15:53:47+5:302020-07-05T15:54:25+5:30

शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत येणा-या समस्या तनपुरे यांच्यासमोर मांडल्या. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, अशा अनेक समस्या शेतक-यांनी सांगितल्या.

No guarantee for crops, no water for agriculture .. Farmers express their grievances to Minister of State Tanpure | पिकांना हमीभाव नाही, शेतीला पाणीही नाही.. राज्यमंत्री तनपुरेंकडे शेतकऱ्यांनी व्यक्त केली खदखद

पिकांना हमीभाव नाही, शेतीला पाणीही नाही.. राज्यमंत्री तनपुरेंकडे शेतकऱ्यांनी व्यक्त केली खदखद

Next

केडगाव : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने जेऊर पंचक्रोशीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्या उपस्थितीत शिवार फेरी पार पडली. नगर तालुक्यातील जेऊर, इमामपूर, बहिरवाडी, ससेवाडी येथील पिकांची पाहणी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत येणा-या समस्या तनपुरे यांच्यासमोर मांडल्या. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकांवर पडणारे विविध रोग व त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतीसाठी मजुरांची समस्या, शेतमालाला हमीभाव नाही, पिकांचे भवितव्य संपूर्णत: पावसावर अवलंबून, अशा अनेक समस्या शेतक-यांनी सांगितल्या.
या प्रसंगी दत्तात्रय म्हस्के, रमेश मोकाटे, रामदास ससे, बाबासाहेब मोकाटे, संजय आवारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: No guarantee for crops, no water for agriculture .. Farmers express their grievances to Minister of State Tanpure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.