शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

नितीन आगेच्या मारेक-यांना शिक्षा झाली पाहिजे; रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 8:32 PM

या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मयत नितीन आगेचे वडील राजू आगे यांंना दिले.

देवळाली प्रवरा : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता़ जामखेड) गावात अकरावीचा विद्यार्थी नितीन आगे याची भरदिवसा हत्या करण्यात आली. मात्र साक्षीदार फितूर झाल्याने नितीन आगेचे मारेकरी जरी निर्दोष सुटले असे असले, तरी त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. त्याशिवाय नितीन आगेला न्याय मिळणार नाही. या केसमधील फुटलेल्या साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. नितीनच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊ, असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मयत नितीन आगेचे वडील राजू आगे यांंना दिले.बांद्रा येथील संविधान निवासस्थानी रविवारी नितीन आगेचे वडील राजू आगे यांनी मंत्री रामदास आठवले यांची भेट घेऊन दिवंगत नितीन आगेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. राजू आगे यांच्या कुटुंबाला खर्डा गावात धोका आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी रिपाइंतर्फे दिवंगत नितीन आगेच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून अधिक एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे आश्वासन आठवले यांनी राजू आगे यांना दिले. कोपडी व खर्डा एकाच जिल्ह्यातील या दोन्ही केसमधील वेगवेगळे निकाल आल्यामुळे समाजात संदेश चुकीचा जात आहे. त्यामुळे नितीन आगेच्या मारेकºयांना फाशी झाली पाहिजे. या केसमधील फुटीर साक्षीदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली मागणी असल्याचे आठवले म्हणाले. नितीन आगे हा केवळ राजू आगे यांचा मुलगा नाही, तर आता तो संपूर्ण आंबेडकरी समाजाचा मुलगा आहे. सर्व समाज आगे कुटुंबाच्या पाठिशी आहे, असे आश्वासन आठवले यांनी दिले. यावेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, हेमंत रणपिसे, नगरसेवक सुरेंद्र थोरात, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.

आठवले ३१ तारखेला नगरच्या दौ-यावर

खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील फितूर साक्षीदारांविरोधात सरकारच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात याचिक दाखल करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ३१ डिसेंबर रोजी नगर जिल्ह्याच्या दौ-यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड