शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नेवासा : शिक्षक कॉलनीत घरफोडी, सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 4:52 PM

नेवासा येथील शिक्षक कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घर फोडून दीड लाख रुपये व चार तोळे तीन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह सुमारे दोन लाख

नेवासा : नेवासा येथील शिक्षक कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घर फोडून दीड लाख रुपये व चार तोळे तीन ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह सुमारे दोन लाख तेरा हजार पाचशेचा ऐवज चोरून नेला. ज्ञानेश्वर शुक्रे यांच्या फियार्दीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.    शिक्षक कॉलनीत राहणारे ज्ञानेश्वर जयराम शुक्रे हे आपली पत्नी मुली व जावई नातवासमवेत दि.१ जुलै रोजी दुपारी पंढरपूरला दर्शनासाठी गेले होते. दि.२ जुलै रोजी सकाळी शेजारी राहणारे मोहन गुजर यांनी शुक्रे यांना फोन करून कळविले की घराचे कुलूप तोडलेले दिसत आहे. त्यानंतर शुक्रे आपल्या परिवारासह घरी आले असता घराचे सेफ्टी डोअरला व आतील दरवाज्याला लावलेले लॉक तोडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता लाकडी कपाटांमधील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. बेडरूममधील लाकडी कपातीचे लॉक तोडून दीड लाख रुपये रोख रक्कम व ६३ हजार पाचशे रुपयांचे ४३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा २ लाख तेरा हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे ज्ञानेश्वर शुक्रे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर