राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च

By admin | Published: June 27, 2014 11:07 PM2014-06-27T23:07:26+5:302014-06-28T01:11:16+5:30

खर्डा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च खर्डा येथून निघून अहमदनगर मार्गे पुणे (हडपसर) येथे समारोप होणार आहे.

National Integration Forum Violence Against Violence Against March | राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च

राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च

Next

खर्डा (जि. अहमदनगर) : राष्ट्रीय एकता मंच हिंसाचार विरोधी निर्धार मार्च खर्डा येथून निघून अहमदनगर मार्गे पुणे (हडपसर) येथे समारोप होणार आहे.
या हिंसाचार विरोधी निर्धार मार्चमध्ये मौलाना आझाद विचार मंच, महिला विकास केंद्र, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, युसुफ मेहरअली सेंटर, अखिल भारतीय खाटीक संघटना व संभाजी ब्रिगेड आदी विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. यात यापुढे निरपराधांचा बळी जाऊ नये हा संदेश देण्यासाठी निर्धार मार्च आहे, असे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
खर्डा शासकीय विश्रामगृहावर निर्धार मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. विश्रामगृहावर झालेल्या सभेत खासदार हुसेन दलवाई, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सुशिला मोराळे, अर्चना सातपुते आदींसह मार्चमधील वक्त्यांची भाषणे झाले.
प्रा.सुशिला मोराळे म्हणाल्या, माणूस नावाची जात मानतो, जात, धर्म,पंथ न मानता माणूस नावाची जात मानणारांपैकी आपण आहोत. माणसाने माणसाबरोबर माणसाप्रमाणे वागले पाहिजे. पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता नि:पक्षपाती तपास करून अन्याय झालेल्यांना न्याय कसा मिळेल याची दक्षता घेऊन सहकार्य करावे.
खा.हुसेन दलवाई म्हणाले, हिंसाचार विरोधी निर्धार मार्च हा कुठल्या जातीधर्माच्या विरोधात नाही, जनतेला जागृत करून अन्याय कोणावर होणार नाही याची दक्षता घेऊन जनता जागृत होण्यासाठी निर्धार मार्च काढला आहे. शिवाजी महाराजांची विटंबना महाराष्ट्रातील मुस्लीम करणार नाही हे दुसरे कोणी तरीच केले. मुस्लिमांना खरा न्याय दिला व मानाने वागवले तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी वागवले. कायदा सुव्यवस्था काही प्रमाणात ढिसाळ झाल्याचे दिसून येते. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी, त्यांचा मुख्य सूत्रधार अजून अटक झालेले नाही. सिमी संघटनेच्या विरोधात कठोर निर्णय घेऊन बंदी आणली तसा निर्णय दुसऱ्या संघटनांवर कडक कार्यवाही करून घ्यावा. हिंसाचाराच्या विरोधात लढा उभा करून समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम होऊ नये, जनतेला क्रियाशील करण्यासाठी निर्धार मार्च काढला आहे.
यापुढे निरपराधांचा बळी जाऊ नये हा संदेश देण्यासाठी निर्धार मार्च आहे. अन्यायग्रस्तांच्या आई-वडिलांना मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन तपासाची योग्य दिशा द्यावी, असे निवेदन देण्याचे खा.हुसेन दलवाई यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: National Integration Forum Violence Against Violence Against March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.