नारायणगव्हाणचा शेतकरीपुत्र झाला तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 03:16 PM2020-06-28T15:16:34+5:302020-06-28T15:16:58+5:30

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब सीताराम शेळके यांचा मुलगा रामदास शेळके यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांची नुकतीच तहसीलदारपदी निवड झाली. 

Narayangavhan's son became a tehsildar | नारायणगव्हाणचा शेतकरीपुत्र झाला तहसीलदार

नारायणगव्हाणचा शेतकरीपुत्र झाला तहसीलदार

Next

कानिफनाथ गायकवाड । 

 पळवे : पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील शेतकरी भाऊसाहेब सीताराम शेळके यांचा मुलगा रामदास शेळके यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांची नुकतीच तहसीलदारपदी निवड झाली. 

यापूर्वी त्यांनी पोलीस उपनिरीक्षक, तलाठी, विक्रीकर निरीक्षक अशा वेगवेगळ्या पदावर काम केले. आता खडतर प्रयत्न करून त्यांनी तहसीलदारपदी मजल मारत तरूणांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला. 

२००७  साली पुणे येथील कृषी महाविद्यालयातून बीएस्सी अ‍ॅग्री ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१० साली एमपीएससी परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नातून त्यांनी पोलीस उपनिरीक्षकपदी बाजी मारली. परंतु, एक वेगळेच स्वप्न घेऊन ते पुणे येथे गेल्याने त्यांनी पुढचा अभ्यास चालू ठेवला.

घरची परिस्थिती बेताची असल्याने पुन्हा कामगार तलाठी ही परीक्षा दिली. त्यातही ते उत्तीर्ण झाले. तलाठी म्हणून मुळशी (जि. पुणे) येथे काही काळ काम केले. परंतु, त्या कामात त्यांचे मन रमले नाही. पुन्हा त्या पदाचा राजीनामा देत पुढचा अभ्यास सुरू केला. 

२०१२ साली विक्रीकर निरीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती झाली. ते पुणे येथील राज्य वस्तू व सेवाकर भवन येथे २०१२ पासून आतापर्यंत ते विक्रीकर निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्या त्यांची तहसीलदारपदी निवड झाली.

Web Title: Narayangavhan's son became a tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.