In Nagar district, there would not have been time to increase the number of corona patients: MP Sujay Vikhe | तर नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची वेळ आलीच नसती- खासदार सुजय विखे 

तर नगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची वेळ आलीच नसती- खासदार सुजय विखे 

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून ज्या भागात रुग्ण सापडले आहेत, तेथील ट्रेसिंग झाली नाही. पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील व्यक्तींची ट्रेसिंग करून त्यांच्यावर तातडीने उपचार केले असते तर ही वेळ नगर जिल्ह्यावर आली नसती, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.


डॉ. विखे म्हणाले, जिल्हााधिकारी हे माझे चांगले मित्र आहेत. आमच्या चांगला संवाद आहे. माझ्याकडून काही माहिती त्यांनी घेतली परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही.

प्रशासनाने वेळीच अंमलबजावणी केली असती तर निश्चितच नगर जिल्ह्यावर ही वेळ आली नसती. जिल्हा प्रशासन माझे ऐकत नाही, याबाबत माझ्या मनात जे काही होते ते मी केंद्रीय समितीसमोर मांडलेले आहे. समितीच्या बैठकीत काय झाले हे आम्हाला बाहेर सांगता येत नाही. परंतु मला जे काही सांगायचे आहे. ते मी लेखी स्वरूपामध्ये सांगितलेले आहे.

Web Title: In Nagar district, there would not have been time to increase the number of corona patients: MP Sujay Vikhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.