साकुरमधील मुस्लिम बांधव घरातच रमजान ईद साजरी करणार; मुस्लिम जमात ट्रस्टचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 01:19 PM2020-05-22T13:19:34+5:302020-05-22T13:20:28+5:30

संगमनेर तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली. 

Muslim brothers in Sakura will celebrate Ramadan Eid at home; Decision of the Muslim Jamaat Trust | साकुरमधील मुस्लिम बांधव घरातच रमजान ईद साजरी करणार; मुस्लिम जमात ट्रस्टचा निर्णय

साकुरमधील मुस्लिम बांधव घरातच रमजान ईद साजरी करणार; मुस्लिम जमात ट्रस्टचा निर्णय

googlenewsNext

संगमनेर : तालुक्यातील साकूर येथील मुस्लिम बांधव अत्यंत साध्या पध्दतीने घरातच औपचारिक विधी पार पाडत यंदा रमजान ईद साजरी करणार आहे, अशी माहिती मुस्लिम जमात ट्रस्ट, साकूरचे अध्यक्ष इसाक पटेल व मुस्लिम सेवा संघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी दिली. 
    देशासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे उद्योग, व्यवसाय, कारखाने सर्व काही बंद असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रस्टच्यावतीने साकूर परिसरातील गरजू कुटुंबांना अन्न धान्य, किराण्याचे वाटप करण्यात आले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता यंदा ईदसाठी नवीन कपडे आदी वस्तू खरेदी करू नये. यावर्षी ईदगाह अथवा मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण होणार नाही. घरातच नमाज पठण करू. संपूर्ण विश्वकल्याण्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन ट्रस्टचे उपाध्यक्ष अश्पाक पटेल, ग्रामपंचायत सदस्य दादा पटेल, रफीक चौगुले, अल्ली मोमीन, शेरमहंमद हवालदार, हैदर पटेल, ईस्माइल शहा  यांनी केले आहे.

Web Title: Muslim brothers in Sakura will celebrate Ramadan Eid at home; Decision of the Muslim Jamaat Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.