Murder of a woman in a robbery: buried in front of house; Relatives in police custody | दरेवाडीत महिलेचा खून : घरासमोरच पुरले; नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात

दरेवाडीत महिलेचा खून : घरासमोरच पुरले; नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर : नगर तालुक्यातील दरेवाडी येथे महिलेचा खून करून मृतदेह घरासमोर पुरल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे.
राजनंदा महादेव आगाशे (वय ५०) असे मयत महिलेचे नाव आहे. कामानिमित्त नांदेड येथून आलेले आगाशे कुटुंब चार वर्षांपासून दरेवाडी येथे स्थायिक आहे. मयत राजनंदा या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. त्या पती, दोन मुले व सुनांसह राहत होत्या. बुधवारी सकाळी आगाशे यांच्या घराजवळ दुर्गंधी येऊ लागल्याने ग्रामस्थांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक प्रविण पाटील, उपनिरिक्षक गायकवाड, देशमुख, कॉस्टेबल राजू सुद्रिक यांचे पथक दाखल झाले. दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणची माती उकरली तेव्हा राजनंदा यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी केली तेव्हा राजनंदा यांना कुणीतरी मारून घराजवळ पुरल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेबाबत नातेवाईकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी चौकशीसाठी मयत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Murder of a woman in a robbery: buried in front of house; Relatives in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.