नगर मनपा निवडणूक २०१८ : सेनेची तिसरी यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:45 PM2018-11-17T13:45:41+5:302018-11-17T13:46:06+5:30

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली होती.

Municipal Elections 2018: The third list released by the army | नगर मनपा निवडणूक २०१८ : सेनेची तिसरी यादी जाहीर

नगर मनपा निवडणूक २०१८ : सेनेची तिसरी यादी जाहीर

Next

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली होती. तिस-या यादीमध्ये केडगाव हत्याकांडातील संजय कोतकर यांच्या पत्नीस सेनेने उमेदवारी दिली आहे.
आज जाहीर केलेल्या तिस-या यादीमध्ये १८ जणांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभाग १ मधून हेलन पाटोळे, दमयंती नांगरे, प्रभाग ३ मधून भास्कर पांडुळे, प्रभाग ४ मधून संगीता केरूळकर व बलराम सचदेव, प्रभाग ६ मधून सारिका भुतकर, पुष्पाताई वाकळे, प्रभाग ९ मधून जयश्री सोनवणे, कविता दहिफळे व गौरव ढोणे, प्रभाग ११ मधून अरुणा गोयल आणि सुनिता मैड, प्रभाग १६ मधून शांताबाई शिंदे, सुनिता कोतकर, विजय पठारे, ज्ञानेश्वर येवले , प्रभाग १७ मधून सुभाष कांबळे व मनीषा कारखेले यांनी उमेदवारी दिली आहे.

Web Title: Municipal Elections 2018: The third list released by the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.