मुळा धरणाचे पाणी नियोजन गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:44 PM2017-11-12T16:44:21+5:302017-11-12T16:48:02+5:30

गेल्या चार वर्षापासून मुळा पाटबंधारे खात्याची १५ आॅक्टोबरला होणारी पाणी वाटप सल्लागार समितीची बैठक होत नाही़ धरणाचे पाणी वाटप गुलदस्त्यात असून मंत्रालयातून पाणी नियोजन होण्याची चर्चा आहे़ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मात्र संशोधनाच्या नावाखाली मनसोक्त पाणी मिळत असल्याचे आढळून आले आहे़

Mula dam water planning bouquet! | मुळा धरणाचे पाणी नियोजन गुलदस्त्यात!

मुळा धरणाचे पाणी नियोजन गुलदस्त्यात!

googlenewsNext
ठळक मुद्देचा-या दुरूस्ती कधी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
राहुरी : गेल्या चार वर्षापासून मुळा पाटबंधारे खात्याची १५ आॅक्टोबरला होणारी पाणी वाटप सल्लागार समितीची बैठक होत नाही़ धरणाचे पाणी वाटप गुलदस्त्यात असून मंत्रालयातून पाणी नियोजन होण्याची चर्चा आहे़ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मात्र संशोधनाच्या नावाखाली मनसोक्त पाणी मिळत असल्याचे आढळून आले आहे़
२६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण असलेल्या मुळा धरणाची पाणी पातळी घटू लागली आहे़ तीन आठवड्यापासून धरणाकडे होणारी पाण्याची आवक बंद झाली आहे़ सध्या धरणात २५ हजार ७६८ दशलक्ष घनफूट पाणी साठा शिल्लक आहे़ धरणाच्या उजव्या कालव्यातून विद्यापीठासाठी ३ नोव्हेंबरपासून ४३ क्यूसेकने पाणी आवर्तन सुरू आहे़ मुबलक पाणी मिळत असल्याने विद्यापीठाकडे ठिबक व तुषारचा वापर अत्यल्प आहे़ याउलट विद्यापीठ शेतक-यांना ठिबक वापरण्याचा सल्ला देत आहे़ वर्षाकाठी धरणातील ५०० दशलक्ष घनफूट पाणी वापरणाºया विद्यापीठाचे पाणी किती वाया जाते याचीही चर्चा दरवर्षी होते़
शेतक-यांची सध्या आवर्तनाची मागणी नाही़ मात्र पाणी वाटप सल्लागार समितीची बैठक उशीरा होत असते़ १५ डिसेंंबरनंतर रब्बी व उन्हाळी आवर्तन होण्याची चिन्हे आहेत़ यंदा मुळा धरण सलग दुसºया वर्षी भरले आहे़ धरणातून जायकवाडीला ३५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले़ नदीकाठी असलेले सर्व बंधारेही पाण्याने भरले आहेत़
यंदाचा पाणी साठा लक्षात घेता मुळा धरणातून रब्बीसाठी एक आवर्तन मिळण्याचे चिन्हे आहेत़ याशिवाय उन्हाळ्यासाठी दोन आवर्तन मिळू शकतात़ धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात येईल़ पहिले प्राधान्य पिण्याचे पाणी, दुसरे प्राधान्य उद्योग व नंतर शेतीसाठी पाणी असे नियोजन आहे़
.....
चा-या दुरूस्ती कधी होणार
नादुरूस्त चा-यामुळे मुळा धरणातील ५० टक्के पाण्याची नासाडी होते़ चाºयांची दुरूस्ती पाणी वापर सहकारी संस्था व शासन व्यवस्थीत करीत नसल्याने शेतक-यांची पाण्याबाबत ओरड येते़ गेल्यावर्षी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चा-यांचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता़ कालवा व चा-यामुळे गरज असताना उशीराने पाणी सोडण्याची नामुष्की ओढावली होती़ सध्या चा-यांची दुरूस्ती झाली तर पाण्याची योग्य नियोजन होऊ शकते़
....

Web Title: Mula dam water planning bouquet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी