Motorcycle theft | मोटारसायकलची चोरी

मोटारसायकलची चोरी

--------------

मोबाइलची चोरी

अहमदनगर : इमामपूर येथील तरुणाचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरी झाला. याबाबत विशाल जनार्दन मोकाटे (रा. इमामपूर, जेऊर, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीत इमामपूर येथील मतदान केंद्राबाहेर अज्ञात चोरट्याने मोकाटे यांचा मोबाइल चोरून नेला.

------------

अपघातात तरुण जखमी

अहमदनगर : नगर-औरंगाबाद रस्त्यावर लिलियम पार्कजवळ झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. याबाबत जखमी अनिकेत संजय वाघमारे (२०) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १३ जानेवारी रोजी फिर्यादी, त्याचा मित्र तुषार साळवे व फिर्यादीचे मामा असे शनिशिंगणापूर येथे जात असताना कारचालकाच्या डोळ्यावर अचानक समोरील कारचा प्रकाशझोत आल्याने कारचालक तुषार याने गाडीचा ब्रेक दाबल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. वाहन अविचाराने चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तुषार सुनील साळवे (रा. बाराबाभळी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Motorcycle theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.