शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मोदीजी, अण्णा हजारेंच्या पत्रांना उत्तर द्या,  नागेश्वर मंडळाचे डिजीटल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 5:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना उत्तर द्यावे व लोकपाल व शेतक-यांसाठी स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीचे पाच हजार मेसेज पंतप्रधान मोदी यांच्या फेसबूक, व्टिटर, ई-मेलवर पाठविण्याच्या अभिनव आंदोलनास रविवारी पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या युवकांनी प्रारंभ केला़

पारनेर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पत्रांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अण्णांच्या पत्रांना उत्तर द्यावे व लोकपाल व शेतक-यांसाठी स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीचे पाच हजार मेसेज पंतप्रधान मोदी यांच्या फेसबूक, व्टिटर, ई-मेलवर पाठविण्याच्या अभिनव आंदोलनास रविवारी पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या युवकांनी प्रारंभ केला़जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या अडीच वर्षांत लोकपालची अंमलबजावणी करावी, शेतक-यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे़ या पत्रांना पंतप्रधान कार्यालयाने केवळ कार्यवाही सुरू आहे़ लवकर निर्णय घेण्यात येईल, असे त्रोटक उत्तर दिले आहे़ आता अण्णा हजारे यांनी पुन्हा दिल्ली येथे लोकपाल  व शेतकºयांच्या प्रश्नांसाठी स्वामीनाथन् आयोग अंमलबजावणी करावी, यासाठी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे़ अण्णा हजारे यांच्या पत्राला तातडीने उत्तर मिळावे म्हणून पारनेर येथील नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष सखाराम बोरूडे, कल्याण थोरात, समीर शेख, नजीर तांबोळी, सुहास मोढवे, गणेश कावरे, धीरज महांडुळे, अनिकेत रमेश औटी, रायभान औटी, संदीप खेडेकर, सचिन बडवे,  डॉ़नरेद्र मुळे,उदय शेरकर, प्रमोद गोळे, दत्ता शेरकर, राजेंद्र म्हस्के, सतिष म्हस्के, मनोज गंधाडे, विनोद गोळे, हौशीराम वाढवणे,सतिष इंगळे या युवकांनी  अभिनव डिजीटल आंदोलनास सुरवात केली आहे़ यामध्ये पंतप्रधानांच्या फेसबुक पेज, व्टिटर, ई-मेलवर पंतप्रधान मोदीजी, अण्णा हजारे यांच्या पत्रांना उत्तर द्या, लोकपालची व स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करा, असे मेसेज पाठवणार आहेत़ पारनेर शहरासह तालुक्यातून सुमारे पाच हजार मेसेज या सोशल मीडियावर धडकणार असून मोदी यांच्या डिजीटल इंडियाला डिजीटल आंदोलनातूनच उत्तर देणार असल्याचे युवकांनी सांगीतले़