शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

निसरड्या रस्त्यावर ‘मनसे’ सत्यनारायण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 7:43 PM

कोपरगाव : शहरातील बाजार समिती समोर घसरगुंडी होऊन अपघात घडत असल्याने बुधवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीअंगावर चिखल माखून रस्त्याच्या मधोमध सत्यानारायण पूजा केली.

ठळक मुद्देनगरपालिकेचा निषेधबाजार समितीसमोर चिखलात आंदोलन
कोपरगाव : शहरातील बाजार समिती समोर घसरगुंडी होऊन अपघात घडत असल्याने बुधवारी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीअंगावर चिखल माखून रस्त्याच्या मधोमध सत्यानारायण पूजा केली. गोदावरी पेट्रोल पंप ते जुना टाकळी नाका रस्त्यावर नगरपालिकेने खडी व माती मिश्रीत मुरूम टाकल्याने पावसात प्रचंड दलदल तयार झाली आहे. रस्त्याची घसरगुंडी झाल्याने दररोज अनेक अपघात होत आहेत. ठेकेदाराची मनमानी व पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द करताच मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतीश काकडे व अलिम शहा यांनी बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांसह स्वत:च्या अंगाला चिखल माखून रस्त्याच्या मधोमध सत्यानारायण पूजा घातली. पुजेतील चौरंगास फुलांऐवजी चिखल वाहून अभिषेक करण्यात आला. पालिकेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास गणेशोत्सव दरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गायकवाड यांनी दिला. काकडे व शहा यांनी पालिकेच्या कार्यपध्दतीवर सडकून टिका केली. या अभिनव आंदोलनात सचिन खैरे, रघु मोहीते, अनिल गाडे, सतीश खरात, संजय जाधव, सुजल चंदनशिव, बंटी सपकाळ, प्रवीण लहिरे, संतोष लहिरे, निलेश काकडे, सुरेश सुपेकर, गणेश जाधव, छोटू पठाण आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. .......................................फोटो-२३०८२०१७केओपी०२ आंदोलन ओळ: कोपरगावच्या बाजार समितीसमोरील निसरड्या रस्त्यात अंगावर चिखल माखून सत्यनारायण पूजा घालताना मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतिश काकडे, अलिम शहा व इतर कार्यकर्ते.