शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

प्रेमप्रकरणातून मित्राचाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 6:09 PM

संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या युवकाचा प्रेमप्रकरणातून मित्रानेच धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केला.

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या युवकाचा प्रेमप्रकरणातून मित्रानेच धारदार चाकूने भोसकून निर्घृण खून केला. तब्बल सहा दिवसानंतर (गुरुवारी) खांडगाव शिवारातील कपाळेश्वर डोंगराच्या मागे त्याचा मृतदेह आढळून आला. या खून प्रकरणी अल्पवयीन मित्राविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली.संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील प्रमोद संजय वाघ (वय १७) हा संगमनेर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विद्यार्थी आहे. कॉजेलला चाललो, असे सांगून तो शनिवारी घराबाहेर पडला. मात्र तो घरी आलाच नाही. दोन-तीन दिवस त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भिकाजी कारभारी सांगळे (रा. तिगाव) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीकडून अपहरण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तपासाकामी पोलीस पथक नेमले होते.शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आम्ही दोघे फिरण्यासाठी खांडगाव शिवारातील कपालेश्वर डोंगराकडे गेले होतो. त्याठिकाणी आमच्यात प्रेमप्रकरणातून जोरदार वादावादी झाली. त्यानंतर आपण चाकूने भोकसून प्रमोदचा खून केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे, हे. कॉ. परमेश्वर गायकवाड, पो. नाईक बाबा खेडकर, लुमा भांगरे यांच्या पथकाने आरोपीस घटनास्थळी नेले. खांडगाव शिवारातील डोंगराच्या पाठीमागे प्रमोद वाघ याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. गुन्ह्यात वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला.याप्रकरणी अल्पवयीन मित्राविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीस बाल न्यायालयासमोर हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे अधिक तपास करीत आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.कॉल डिटेल्सवरून छडा...च्पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्सच्या आधारे शोध घेतला. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे एका अल्पवयीन मित्रास ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखवला असता त्याने खुनाची कबुली दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर