Minister Prajakat Tanapure defamed on WhatsApp group; Report to the police | मंत्री प्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर बदनामी; पोलिसात तक्रार

मंत्री प्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर बदनामी; पोलिसात तक्रार

राहुरी : नगरविकास राज्यमंत्रीप्राजक्त तनपुरे यांची व्हॉटस् अ‍ॅपवर बदनामी केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे राहुरी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मंत्रीप्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी गणेगाव येथे विविध कार्यक्रमाचा शुभारंभ झाला होता. त्यानंतर आदर्श गाव या नावाने असलेल्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवर विकास कोबरणे, आदिनाथ कोबरणे, पोपट कोबरणे, प्रवीण कोबरणे, महेश भणगडे (रा. गणेगाव) यांनी बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला. सागर कोबरणे यांनी विकास कामांची शहानिशा न करता मजकूर मोबाईलवरून व्हायरल केल्याची तक्रार संतोष आघाव यांनी केली आहे. या प्रकरणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष आघाव यांनी केली आहे.

Web Title: Minister Prajakat Tanapure defamed on WhatsApp group; Report to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.