शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

एमआयडीसीतील मटका रॅकेटचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 10:27 PM

दोघा बुकींसह चार पंटर अटकेत: संघटनेच्या नावाखाली पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देमटक्यावर कारवाई करणाºया पोलिसांविरोधात पत्रकबाजी

अहमदनगर : एमआयडीसी परिसरातील चेतना कॉलनी, सह्याद्री चौक परिसरात सुरू असलेल्या मटका रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे़ शुक्रवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी छापे टाकून दोन बुकींसह चार जणांना ताब्यात घेत ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद चव्हाण यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई करत जितेंद्र पाटोळे व निलेश म्हसे या बुकींना ताब्यात घेतले़ म्हसे हा मावळा संघटनेचा अध्यक्ष आहे़ पाटोळे व म्हसे यांच्या सांगण्यानुसार मटका चालविणारे भाऊसाहेब रामचंद्र वरूटे (रा़ वडगाव गुप्ता), कय्युम अकबर सय्यद, अजमुद्दीन गुलाब सय्यद, महेंद्र शिवराम कदम (रा़ गजानन कॉलनी, नवनागापूर) यांनाही अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़चेतना कॉलनी येथे राहणारा जितेंद्र पाटोळे यांच्या घरातच मटक्याचे सेंटर होते़ इतर ठिकाणी चालविण्यात येणाºया मटक्यातून जमा होणारी रक्कम या सेंटरवर आणली जात होती़ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ यावेळी पोलिसांनी पाटोळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने निलेश म्हसे हा पार्टनर असल्याचे सांगत त्याचे कारनामे उघड केले़मटक्यावर कारवाई करणाºयापोलिसांविरोधात पत्रकबाजीनिलेश म्हसे हा मावळा संघटनेचा अध्यक्ष आहे़ त्याच्या मटका अड्ड्यांवर कुणी पोलीस कर्मचाºयांनी कारवाई केली तर संघटनेच्या लेटरपॅडवर त्या पोलीस कर्मचाºयाची वरिष्ठ पोलीस अधिकाºयाकडे तक्रार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता़ त्यामुळे त्याचे मटका रॅकेट चांगलेच तेजीत आले होते़ या मटका अड्ड्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना खबºयामार्फत माहिती मिळाली होती़ शर्मा यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पथकासह थेट मटका अड्ड्यांवर छापा टाकून बुकींसह त्यांच्या पंटरांवरही कारवाई केली़ कारवाई दरम्यान चव्हाण यांना म्हसे याने फोन करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता़ चव्हाण यांनी मात्र दबावाला बळी न पडता धडक कारवाई केली़