शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

शेवगाव तालुक्यातील कांबीचे सरपंचासह सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 12:26 PM

सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदारांनी दत्तक घेतलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी गावच्या सरपंच सविता अशोक मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी कार्यकाळात ग्रामपंचायतचे हित जोपासण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये पदावर राहण्यास विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी अपात्र ठरविले आहे.

बोधेगाव : सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदारांनी दत्तक घेतलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी गावच्या सरपंच सविता अशोक मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी कार्यकाळात ग्रामपंचायतचे हित जोपासण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये पदावर राहण्यास विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी अपात्र ठरविले आहे.या आदेशामुळे स्थानिक राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. सरपंच सविता मस्के व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी नगर भूमापन क्रमांक ३२२, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३९, ३३२ ३३३, ३३४, ३३५, ३५९ च्या जागेबाबत अहमदनगर येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अहमदनगर यांच्याकडील अपील अर्ज क्रमांक १६८४, २०१६ व १९७ ,२०१५ नुसार ३० सप्टेंबर २०१६ रोजी निर्णय दिला. हा निकाल ग्रामपंचायत विरोधातगेला.या निकालाबाबत संचालक भूमिअभिलेख नाशिक यांच्याकडे अपील करावे किंवा नाही, यासाठी ग्रामपंचायतीमध्ये २७ एप्रिल २०१६ रोजी मासिक सभा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये सरपंच सविता मस्के व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी अपील करू नये, असे मत बैठकीत नोंदविले होते.ग्रामपंचायत जागेबाबत विरोधात गेलेल्या निकालाबाबत वरिष्ठ कार्यालयास अपील करण्याबाबत बैठकीत मत नोंदविणे आवश्यक असताना अपील करू नये, असे मत नोंदविल्याने सरपंच व सदस्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्या बाबत माजी सरपंच सुनीलसिंग राजपूत व सहा सदस्यांनी तक्रार दाखल केली होती. त्याची नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यलयात सुनावणी झाली.विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) प्रमाणे विद्यमान सरपंच सविता मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे.तक्रारदार राजपूत यांच्या वतीने अ‍ॅड. एस. बी. पारनेरे तर सरपंच सविता मस्के व होळकर यांच्या बाजूने अ‍ॅड. वेलदे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव