शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

मायंबा देवस्थानच्या जलसंवर्धन मोहिमने पर्यटनालाही चालना;  धबधबे, डोंगरातील हिरवळ लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 3:16 PM

मायंबा (मत्सेेंद्रनाथ) देवस्थानने आता धार्मिकतेला निसर्ग पर्यटनाची जोड दिली आहे. देवस्थानने जलसंवर्धन मोहीम हाती घेऊन पाच लाख वनौषधींची लागवड केली आहे. येथे पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर यामुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे.

चंद्रकांत गायकवाड । तिसगाव : मायंबा (मत्सेेंद्रनाथ) देवस्थानने आता धार्मिकतेला निसर्ग पर्यटनाची जोड दिली आहे. देवस्थानने जलसंवर्धन मोहीम हाती घेऊन पाच लाख वनौषधींची लागवड केली आहे. येथे पावसाळ्यात कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर यामुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. याबाबत विश्वस्त व आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने एकात्मिक विकासाचा कृती आराखडा तयार केला असून येत्या पाच वर्षात अंमलबजावणीही केली जाणार आहे. प्रती पंचवार्षिक कालखंडातील विद्यमान आमदारांची विश्वस्त पदावरील पदसिद्ध नियुक्ती, तर शेष विश्वस्त मंडळातही शिक्षित व सेवाभावी वृत्तीच्या समाजसेवकांचा समावेश असल्याने विकास कामांचा वेग वाढून भाविकांना दर्जेदार सुविधा मिळत आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून कल्याण-निर्मळ महामार्गालगतच्या मराठवाडीपासून चिंचपूर इजदे हा रस्ता, श्रीक्षेत्र मढी, शेंडगेवाडी-मायंबा हा घाट वळणाचा रस्ता पूर्णत्वास गेल्याने देवस्थानसाठीचे दळणवळण अधिक सोयीचे झाले आहे.बडेबाबा नामाभिधान असलेले हे ठिकाण गर्भगिरी डोंगररांगाच्या माथ्यावर आहे. राज्यामध्ये सर्वाधिक स्वमालकीची जमीन क्षेत्र असलेले मायंबा हे एकमेव देवस्थान आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात धार्मिकतेबरोबरच निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनेही या पवित्र नाथस्थानाचे महत्त्व अहमदनगर व बीड जिल्ह्यात अग्रक्रमांकावर राहणार आहे. तीन मजली प्रशस्त दर्शनबारी, सुसज्ज अन्नछत्रालय, भक्तनिवास, स्वच्छतागृहे, मत्सेंद्रनाथाचे समाधी मंदिर असा पंचवीस कोटी रूपये खर्चाच्या विकास आराखड्याचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती कार्यरत विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी दिली. शतकोटी वृक्षलागवडी अंतर्गत यावर्षी दोन हजार विविध प्रजातींची झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले.येथे गावरान (देशी) गायींची गोशाळा आहे. गायीच्या शेणाची राख, गोमूत्रापासून साबण तयार करणे, ऐतिहासिक देवतलाव सुशोभीकरण, बगीचाची आधुनिक रचना, स्वतंत्र वाहन पार्किंग व्यवस्था, अशी कामे प्रस्तावित आहेत.पर्यटकांना मोहिनी घालणारा धबधबामंदिराच्या उत्तर बाजूस धोंडाई देवीचे मंदिर, त्याच बाजूला खोल दरीत अमृतेश्वर मंदिर, याच दरीतून मढी, हनुमान टाकळी तीर्थाजवळ जाणाºया कृष्णा पवनागिरी नदीचे उगमस्थान आहे. ही नदी अमृतेश्वराला वळसा घालून पाच हजार फूट दरीत झेपावते. तो उंचीवरून फेसाळणारा मायंबा धबधबा पर्यटकांना मोहिनी घालतो. या दरी प्रवाहात सिमेंट बंधाºयांची मालिकाच आहे.

टॅग्स :templeमंदिरtourismपर्यटन