शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सासरच्या छळास कंटाळून केली विवाहितेने आत्महत्या;  पती, सासूविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:32 PM

सासरच्या छळाला कंटाळून पुष्पा अशोक पवार या विवाहितेने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. याप्रकरणी पती अशोक पवार व सासू सुभद्रा अर्जुन पवार यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा : सासरच्या छळाला कंटाळून पुष्पा अशोक पवार या विवाहितेने गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे घडली. याप्रकरणी पती अशोक पवार व सासू सुभद्रा अर्जुन पवार यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२८ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत पुष्पा हिचा भाऊ सोमनाथ आरसुळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.  पंधरा वर्षांपूर्वी पुष्पा हिचे अशोक पवार याच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहे. अशोक हा दारू पिऊन पुष्पा हिस मारहाण करीत असत. तिचा छळ करीत असत. त्याचप्रमाणे सासू सुभद्रा ही देखील घरातील कौटुंबिक कारणावरून नेहमीच पुष्पा हिला शिवीगाळ करीत असे. मागील पंधरा दिवसांपूर्वी पुष्पा ही सासरी भांडण झाल्याने माहेरी गोमळवाडी येथे गेली. त्यावेळी पती अशोक हा दारू साठी पैसे मागत होता. त्यावेळी पैसे न दिल्याने अशोक याने पुष्पा हिला लथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढल्याचे तिने माहेरी सांगितले. आठ दिवसानंतर पुष्पा हिचे मावस सासरे त्रिंबक पठाडे यांनी पुष्पा हिला पुन्हा सासरी नेले. २७ फेब्रुवारी रात्री दोन वाजेदरम्यान तामसवाडी येथील घरी पुष्पा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती समजताच पुष्पा हिचा भाऊ सोमनाथ, आई मुक्ताबाई व गावातील नातेवाईक तत्काळ तामसवाडी गेले.  यावेळी गावातील ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने पुष्पा हिला नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर पुष्पा हिच्यावर तामसवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाCrime Newsगुन्हेगारी