दुपारपर्यंतच्या अहवालात नगर जिल्ह्यात २६६ जण पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 02:13 PM2020-09-07T14:13:41+5:302020-09-07T14:14:16+5:30

रविवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३३५६ इतकी झाली आहे.

As many as 266 people tested positive in Nagar district till noon | दुपारपर्यंतच्या अहवालात नगर जिल्ह्यात २६६ जण पॉझिटिव्ह 

दुपारपर्यंतच्या अहवालात नगर जिल्ह्यात २६६ जण पॉझिटिव्ह 

Next

अहमदनगर : जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५९ टक्के इतके झाले आहे.

रविवारी सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३३५६ इतकी झाली आहे.


बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ५३, संगमनेर ०३, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर १०, कँटोन्मेंट ७, नेवासा ५, श्रीगोंदा ४३, पारनेर ८, अकोले  ३२, राहुरी ३१, कोपरगाव २६, जामखेड २, कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी ३८० रुग्णांना  बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा ९८, संगमनेर २७, राहाता ३४, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३९, श्रीरामपूर ३२, कँटोन्मेंट १३,  नेवासा ३२, श्रीगोंदा १५, पारनेर २१, अकोले १०, राहुरी १३, शेवगाव ०१,  कोपरगाव १६, जामखेड ०३, कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
--------
अशी आहे कोरोनाची स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या: २२१५०
उपचार सुरू असलेले रूग्ण:३३५६
मृत्यू:३७३
एकूण रूग्ण संख्या:२५८७९
 

Web Title: As many as 266 people tested positive in Nagar district till noon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.