शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

लोकमत इफेक्ट : शहीद जवान म्हस्के यांच्या कन्येला सनराईजने घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 3:06 PM

‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारावीपर्यत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे.

श्रीगोंदा : ‘लोकमत’ने वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रकाशित केलेल्या ‘शूरा आम्ही वंदिले’ या विशेषांकापासून प्रेरणा घेत श्रीगोंदा येथील सनराईज पब्लिक स्कूलने चांडगाव येथील शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्या कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. अंकीता म्हस्के हिस बारावीपर्यत मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून आजी - माजी सैनिकांच्या, आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतक-यांच्या प्रत्येकी दहा मुलींना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ‘जय जवान जय किसान’ ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.‘लोकमत’मध्ये शहीद जवान मधुकर म्हस्के यांच्याविषयी लेख प्रकाशित झाल्यानंतर वीरपत्नी मोहीनी मधुकर म्हस्के यांना सनराईज स्कुलमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर मुलगी अंकिता म्हस्के हीला शिक्षणासाठी दत्तक घेतले. यावेळी ‘जय जवान जय किसान’ या उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला. याअंतर्गत आजी- माजी सैनिकांच्या मुलींना, आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतक-यांच्या १० मुलींना बारावीपर्यत मोफत शिक्षण देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष सतीश शिंदे यांनी दिली. यावेळी प्रशांत गोरे, सागर बोरुडे, प्रसाद काटे, रामदास वाळके, अविनाश ढेरे, विशाल चव्हाण उपस्थित होते.लोकमतला धन्यवाद‘लोकमत’ने जवानांचा पराक्रम आणि त्यांच्या कुंटूबाच्या वास्तव परिस्थितीवर ‘शुरा आम्ही वंदिले’ या विशेषांकातून प्रकाश टाकण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली, त्याबद्दल वीरपत्नी मोहीनी म्हस्के यांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमतIndependence Dayस्वातंत्र्य दिवसShrigondaश्रीगोंदा