शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सातेवाडीच्या शाळेला पाच दिवसांपासून कुलूप : स्वातंत्र्यदिनी ध्वजावंदन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 2:30 PM

अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी ) येथील उज्वला एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातेवाडी या माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून टाळे ठोकले असून स्वातंत्र्य दिनाचा विद्यार्थ्यांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रमही झाला नाही.

कोतूळ : अकोले तालुक्यातील सातेवाडी (जांभळेवाडी ) येथील उज्वला एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सातेवाडी या माध्यमिक विद्यालयास संस्थेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून टाळे ठोकले असून स्वातंत्र्य दिनाचा विद्यार्थ्यांचा ध्वजारोहणाचा कार्यक्रमही झाला नाही. हा कार्यक्रम शाळेत न घेता ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला. सध्या गावात तणावाचे वातावरण असून संस्था पदाधिकारी आल्याशिवाय टाळे उघडणार नाही या भुमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. मात्र पाच दिवसांपासून शाळा बंद असूनही एकही शिक्षण विभागाचा अधिकारी न आल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.सातेवाडी येथेउज्वला एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे १७५ पटसंख्या असलेले न्यू इंग्लिश स्कूल ही दहावीपर्यंतची माध्यमिक शाळा आहे. तसेच या संस्थेचे कोतूळ व उल्हासनगर येथेही व्द्यिालय आहे. संस्थेचा सर्व कारभार मुंबईतूनच चालतो . गेल्या महिन्यात सातेवाडी येथील मुख्याध्यापिका चार दिवस आजारपणाच्या रजेवर असताना संस्थेने येथील दोन शिक्षकांच्या बदल्या कोतूळ येथे केल्या. त्याबदल्यात कोतूळ येथून दोन शिक्षक सातेवाडी येथे बदली दिले त्यात एक शिक्षिका सातेवाडी येथे हजर झाल्यावर तिस-या दिवशी सेवानिवृत्त झाल्या व दुसरे शिक्षक गणित विषयाचे नसताना सातेवाडी येथे दिले. त्यामुळे आता पाचवी ते दहावीपर्यंत या शाळेत केवळ पाच शिक्षक अध्यापन करत आहेत. त्यामध्ये गणित विषयाचा एकही शिक्षक नसल्याने विद्यार्थी व पालकांत संतापाची लाट उसळली. त्यामुळे गावाने एकत्र येऊन शनिवारपासून(११आॅगस्ट) शाळेला टाळे ठोकले.दरम्यान आज स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण देखील शाळेत न करता सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालया समोरच ध्वजारोहण केले. येथील शिक्षकांना देखील शाळेत जाण्यास मज्जाव केला. चक्क पाच दिवस शाळा बंद असून तालुक्यातील शिक्षण विभागाने इकडे लक्ष न दिल्याने शिक्षण विभावर संशयाची सुई फिरत आहे .मी घडलेला सर्व प्रकार संस्थेचे अध्यक्ष यांना पहिल्याच दिवशी कळवला आहे. ग्रामस्थ संस्था पदाधिकारी आल्याशिवाय शाळा उघडू देत नाहीत. मी गावक-यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही. - प्रमिला सुर्वे, मुख्याध्यापिकामला या बाबतीत कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही. असा प्रकार असेल तर चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल. बदल्या कायदेशीर आहेत का याचीही चौकशी होईल. - अरविंद कुमावत, गटशिक्षणाधिकारी, अकोले,

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले