राहुरी शहरात १५ ते २१ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:49+5:302021-04-14T04:19:49+5:30

राहुरी : शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील रुग्णांची परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. त्यामुळे व्यापारी ...

Lockdown in Rahuri city from April 15 to 21 | राहुरी शहरात १५ ते २१ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

राहुरी शहरात १५ ते २१ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

Next

राहुरी : शहरात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरातील रुग्णांची परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांच्या वतीने तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राहुरी शहरात १५ ते २१ एप्रिलदरम्यान लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राहुरी शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णवाढीत दिवसेंदिवस भर पडत आहे. मागील आठवड्यापासून तालुक्यात १४०च्या पुढे तर शहरात दररोज ३० च्या पुढे रुग्ण बाधित होत आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जागा मिळणे अवघड होत चालले आहे. ही वाढत चाललेली रुग्णसंख्या खंडित करण्यासाठी शहरवासीयांना लॉकडाऊनची आवश्यकता वाटत होती. मंगळवारी राहुरीतील सर्व व्यापारी संघटनांच्या अध्यक्षांची मीटिंग झाली. तहसीलदार शेख व पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्या संमतीने १५ ते २१ एप्रिलपर्यंत संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरातील सर्व दवाखाने व हॉस्पिटल चालू राहतील. हॉस्पिटल अटॅच असलेले मेडिकल २४ तास चालू राहतील. पेठेमधील मेडिकल सकाळी आठ ते एक वाजेपर्यंतच चालू राहतील. पतसंस्था व बँका नेहमीप्रमाणे चालू राहतील. भाजीपाला सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू राहील. सर्व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Lockdown in Rahuri city from April 15 to 21

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.