शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

मुबलक वीज असताना भारनियमनाचे चटके!

By admin | Published: September 30, 2014 1:02 AM

चंद्रकांत शेळके , अहमदनगर गेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे.

चंद्रकांत शेळके , अहमदनगरगेल्या तीन महिन्यांपासून भारनियमनाचा विसर पडलेल्या ग्राहकांना सणासुदीच्या तोंडावर ‘एमर्जन्सी लोडशेडिंग’चे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. उच्च वाहिन्यांतील तांत्रिक बिघाडाचे कारण यासाठी दिले जात आहे. राज्यातील समाधानकारक पावसामुळे धरणांची स्थिती उत्तम असून, वीजनिर्मिती केंद्रही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत. पावसाळ््यात बहुतांश कृषिपंप बंदच होते. परिणामी विजेची मागणी घटली. त्यामुळे राज्यात मागणीच्या प्रमाणात वीज उपलब्ध आहे. सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना भारनियमनातून दिलासा मिळावा म्हणून राज्य सरकारनेही खबरदारी म्हणून विजेचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घेतली. सध्या राज्यात १२ ते १३ हजार मेगावॅट विजेची मागणी असून तेवढी वीज उपलब्ध करण्यात आली आहे. परंतु शनिवारपासून औरंगाबाद ते पॉवरग्रीड ४०० केव्हीए, वर्धा ते औरंगाबाद ७६५ केव्हीए व औरंगाबाद ते तळेगाव ४०० केव्हीए या विद्युत वाहिन्यांत तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठ्यात विस्कळीतपणा आला. परिणामी राज्यात तांत्रिक बिघाडाचे कारण देत महावितरणने चार तास भारनियमन सुरू केले. नवरात्रोत्सव काळात भारनियमन होणार नसल्याचे महावितरणने अधिकृतपणे जाहीर केले होते, त्यास ४८ तास उलटत नाहीत, तोच पुन्हा वीज पुरवठा विस्कळीत झाला. बिघाड किरकोळ असल्याने सायंकाळपर्यंत दुरूस्ती होऊन पुरवठा सुरळीत होण्याचे संकेतही महावितरणकडून दिले. शनिवार, रविवार व सोमवार सायंकाळपर्यंतही भारनियमन सुरूच असल्याने ग्राहकांचा संताप अनावर झाला. राष्ट्रपती राजवट लागल्याने सर्व सूत्रे प्रशासनाकडे गेली. एका अर्थाने राज्याला हक्काचा पालक राहिला नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावरच नेमके भारनियमन कसे सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.