Leopards in hostels; Leopard captured on CCTV | वसतिगृहात शिरला बिबट्या

वसतिगृहात शिरला बिबट्या

घारगाव : संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींच्या वसतिगृह परिसरात हा बिबट्या बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान दिसून आला आहे. नांदूर खंदरमाळ येथे सुनंदाताई गहीनाजी भागवत मुलींचे वसतिगृह आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास बिबट्याने या परिसरात प्रवेश केला.

अचानक बिबट्याला पाहून वसतिगृहातील मुली घाबरल्या. मुलींनी आरडाओरडा केल्याने परिसरातील ग्रामस्थांनी वसतिगृहाकडे धाव घेतली. आरडाओरडा झाल्याने बिबट्याने धूम ठोकली.

 

Web Title: Leopards in hostels; Leopard captured on CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.