अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:13 AM2021-02-22T04:13:46+5:302021-02-22T04:13:46+5:30

घारगाव : नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना ...

Leopard killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Next

घारगाव :

नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱा बिबट्या ठार झाल्याची घटना घडली. रविवारी ( दि.२१) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट, डोळासणे, माहुली घाट आदी परिसरात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडत आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास सुमारे दोन वर्षाचा नर बिबट्या रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी वनविभागाला अपघाताची माहिती दिली. सदरची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक सी.डी.कासार,अरुण यादव हे घटनास्थळी धाव घेत पोहोचले. बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी मृत बिबट्याला चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्रात नेण्यात आले.

Web Title: Leopard killed in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.