अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:15 AM2021-06-20T04:15:28+5:302021-06-20T04:15:28+5:30

लोणी : राहाता तालुक्यातील हनमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात ब्राह्मणे- बनसोडे वस्तीजवळ शनिवारी (दि.१९) सकाळी ६ ...

Leopard killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

Next

लोणी : राहाता तालुक्यातील हनमंतगाव शिवारात लोणी-सोनगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात ब्राह्मणे- बनसोडे वस्तीजवळ शनिवारी (दि.१९) सकाळी ६ वाजेदरम्यान नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोणी, कोल्हार, सात्रळ, सोनगाव, पाथरे, हनमंतगाव या प्रवरा पट्ट्यातील गावांच्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडत असतात. शनिवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास सुमारे एक वर्षाचा नर बिबट्या रस्ता ओलांडत असावा आणि त्याचवेळी भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली असावी. या धडकेतच बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर या परिसरातील नागरिकांनी गतप्राण झालेल्या बिबट्याची माहिती लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथीला वन्यजीव प्राणिमित्र विकास म्हस्के यांना कळविली. यावर म्हस्के यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. गाढे, वनरक्षक जी. बी. सुरासे, अरूण यादव घटनास्थळी आले.

कोल्हार येथील पशुसंवर्धन अधिकारी दिलीप खपके यांनी मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी करून रावसाहेब ब्राह्मणे यांच्या शेतात बिबट्याला अग्नी दिला. यावेळी प्रवीण विखे, देवीदास म्हस्के, दीपक घोलप, प्रवीण ब्राह्मणे, वन्यजीव प्राणिमित्र विकास म्हस्के पंच म्हणून हजर होते.

===Photopath===

190621\img-20210619-wa0042.jpg

===Caption===

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

Web Title: Leopard killed in unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.