ऑनलाईन ओपीडी सेवेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:19 AM2020-12-24T04:19:03+5:302020-12-24T04:19:03+5:30

डॉ. फुलसौंदर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना लॉकडाऊनमुळे उपचार घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. यातून त्यांची गैरसोयदेखील झाली. ...

Launch of online OPD service | ऑनलाईन ओपीडी सेवेला प्रारंभ

ऑनलाईन ओपीडी सेवेला प्रारंभ

Next

डॉ. फुलसौंदर म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना लॉकडाऊनमुळे उपचार घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. यातून त्यांची गैरसोयदेखील झाली. त्यामुळे शासनाने मोठ्या शहरांमध्ये हा उपक्रम सुरू केला होता. त्याचा प्रतिसाद पाहता हा उपक्रम सर्वत्र सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतंर्गत रुग्णांनी ई- संजीवनी हे ॲप डाऊनलोड करून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांशी आपल्या आजारासंबंधी संवाद साधायचा आहे. त्यानंतर डॉक्टर आजारानुसार गोळ्या-औषधी लिहून देणार आहेत. या उपक्रमांअंतर्गत कोपरगावसाठी भूलतज्ज्ञ डॉ. विजय गनबोटे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. संदीप वैरागर, शल्य चिकित्सक डॉ. विजय क्षीरसागर तसेच इतरही डॉक्टर ऑनलाईन पद्धतीने मोफत उपचार सेवा देणार आहेत. कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत सेवेचा लाभ घ्यावा, तसेच प्रत्येक रविवारी ऑनलाईन ओपीडीला सुटी असणार आहे.

Web Title: Launch of online OPD service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.