शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी पुण्यात अंतिम बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 6:25 PM

गुरुवारी २४ आॅगस्ट रोजी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त व पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अंतिम बैठक होणार आहे

ठळक मुद्देसहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थिती पुण्यातील साखर संकुलात गुरूवारी चर्चा

अहमदनगर : गुरुवारी २४ आॅगस्ट रोजी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त व पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत पतसंस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी अंतिम बैठक होणार आहे. बैठकित पतसंस्थांच्या प्रश्नांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून अंमल बजावणीबाबत सूचना केल्या जाणार असल्याचीमाहिती सहकारी पतसंस्था आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा यांनी दिली.सहकारी पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सुटावेत, समस्यांचे निराकरण करण्यासाठी नगरमध्ये सहकारी पतसंस्था आंदोलनाची स्थापना करुन जिल्हास्तरीय पतसंस्था बंदचेही आयोजन करण्यात आले होते. सहकारी पतसंस्थांच्या या आंदोलनाची दखल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली.त्यानी स्थैर्य निधी सहकारी संघाच्या पदाधिका-यांसमवेत पुण्यात प्रथमिक बोलणीही केली. पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचेही आश्वासन त्यांनी दिले. पतसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने सहकार खात्याकडे पतसंस्था फेडरेशन, पतसंस्था स्थैर्य निधी सहकरी संघ सातत्याने पाठपुरवठा करत आहे. त्यामुळे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार पतसंस्थांच्या प्रश्न सोडविण्यासाठी मार्ग काढण्यासाठी कच्चा आराखडा तयार करण्यासाठी स्वीय सहाय्यक संतोष पाटील यांना सूचना केल्या होत्या. त्यासंबधी पतसंस्था फेडरेशन, स्थैर्यनिधी सहकारी संघ यांच्या समवेत पुणे येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीस राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सहकारी पतसंस्था आंदोलनाचे निमंत्रक वसंत लोढा, सहकार खात्याचे वरिष्ठ अधिकारी धनंजय डोईफोडे, पतसंस्था फेडरेशनचे महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी, संचालक अ‍ॅड.अशितोष पटवर्धन, सहकार तज्ञ गणेश निमकर,  पतसंस्था फेडरेशनच्या व्यवस्थापिका सुरेखा लवांडे उपस्थित होते. या बैठकीमध्ये कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावर गुरुवारी पुण्यातील साखर संकुल येथे सहकार मंत्री सुभाष देशमुख, सहकार खात्याचे आयुक्त, पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी यांच्या समवेत अंतिम बैठक होणार आहे.