भाजीपाला विक्री बंदचा आदेश रद्द करण्याची किसान सभेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:22 AM2021-05-19T04:22:09+5:302021-05-19T04:22:09+5:30

या निवेदनात म्हटले आहे की, २ मे पासून सलग १५ मे पर्यंत शेतमाल भाजीपाला विक्री बंदी लागू केलेली ...

Kisan Sabha demands cancellation of ban on sale of vegetables | भाजीपाला विक्री बंदचा आदेश रद्द करण्याची किसान सभेची मागणी

भाजीपाला विक्री बंदचा आदेश रद्द करण्याची किसान सभेची मागणी

Next

या निवेदनात म्हटले आहे की, २ मे पासून सलग १५ मे पर्यंत शेतमाल भाजीपाला विक्री बंदी लागू केलेली आहे. ही बंदी शेतकरी व शहरातील लहान मुले, गरोदर महिला व आजारी नागरिक यांच्यावर अन्यायकारक आहे. शेतमाल, भाजीपाला खरेदीकेंद्र सुरू करत मनपा हद्दीतील नागरिकांना पुरविण्याचा उपाय करण्याचेही सुचविले होते; परंतु याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या निर्णयामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. किसान सभा प्रतिनिधी, कृषीमाल उत्पादक, मार्केटयार्डमधील कृषीमाल फळे व भाजीपाला विक्रेते संघटनेचे प्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी, सहकार निबंधक कार्यालय प्रतिनिधी, कृषी विभाग (आत्मा) प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकऱ्यांचा शेतमाल भाजीपाला व फळे मनपा हद्दीतील नागरिकांना कसा पुरवता येईल हे लवकरात लवकर ठरवावे, अन्यथा आयुक्तांच्या निवासस्थानी शनिवारी (२२ मे ) सकाळी ११ वाजलेपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Kisan Sabha demands cancellation of ban on sale of vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.