केडगाव दुहेरी हत्याकांड : फरार भानुदास कोतकरला पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 10:34 AM2018-05-14T10:34:14+5:302018-05-14T10:34:14+5:30

केडगाव दुहेरी हत्याकांडात गुन्हा दाखल झालेल्या भानुदास कोतकरला सोमवारी पुणे येथून विशेष पथकाने अटक केली.

Kedgoan double murder: Bhanudas Kotkar arrested from Pune | केडगाव दुहेरी हत्याकांड : फरार भानुदास कोतकरला पुण्यातून अटक

केडगाव दुहेरी हत्याकांड : फरार भानुदास कोतकरला पुण्यातून अटक

googlenewsNext

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडात गुन्हा दाखल झालेल्या भानुदास कोतकरला सोमवारी पुणे येथून विशेष पथकाने अटक केली. कोतकर येरवडा पोलीस ठाण्यात हजेरी देण्यासाठी आला होता. यावेळी सापळा रचून बसलेल्या नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लॉटरी विक्रेता अशोक लांडे हत्या प्रकरणात कोतकर याला जन्मठेपची शिक्षा झालेली आहे.

केडगाव हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. कोतकरसह आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप यांना अटक करावी या मागणीसाठी हत्याकांडात मृत पावलेल्या कोतकर-ठुबे कुटुंबीयांनी केडगाव येथे गेल्या दोन दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. यानंतर सोमवारी अखेर कोतकरला अटक झाली.

Web Title: Kedgoan double murder: Bhanudas Kotkar arrested from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.