केडगाव हत्याकांडाचा सूत्रधार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:05 AM2018-04-20T02:05:02+5:302018-04-20T02:05:02+5:30

केडगाव पोटनिवडणुकीत मतदानाच्या कारणावरून संजय कोतकर व खोल्लम यांच्यात वाद झाले होते.

Kedgaon murderer founder Zarband | केडगाव हत्याकांडाचा सूत्रधार जेरबंद

केडगाव हत्याकांडाचा सूत्रधार जेरबंद

Next

अहमदनगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या रवी खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले आहे. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून हत्या झाली़ घटनेनंतर रवी खोल्लम फरार झाला होता. केडगाव पोटनिवडणुकीत मतदानाच्या कारणावरून संजय कोतकर व खोल्लम यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर संजय कोतकर यांनी खोल्लमला धमकी दिली होती.

चौघांच्या कोठडीत वाढ
आरोपी संदीप गुंजाळ (मारेकरी), बाबासाहेब केदार, संदीप गिºहे व महावीर मोकळे यांची पोलीस कोठडी गुरुवारी न्यायालयाने २१ एप्रिलपर्यंत वाढवली. खोल्लमला २४ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: Kedgaon murderer founder Zarband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.