करंजी-मिरी-तिसगाव पाणी योजना कुचकामी; ऐन दिवाळीत २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:41 PM2019-10-27T12:41:09+5:302019-10-27T12:41:45+5:30

पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

The Karanji-Miri-Tisgaon water plan is ineffective; Drinking water scarcity in 3 villages in Ain Diwali | करंजी-मिरी-तिसगाव पाणी योजना कुचकामी; ऐन दिवाळीत २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई 

करंजी-मिरी-तिसगाव पाणी योजना कुचकामी; ऐन दिवाळीत २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई 

Next

अशोक मोरे । 
करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजीसह अनेक गावातील पाणी पुरवठा करणा-या विहिरींना पाणी अजूनही पाणी आले नाही. तसेच २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी -मिरी -तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनाच कुचकामी ठरत आहे. ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. 
  पावसाळ्याचे तीन महिने गेले तरी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, भोसे, लोहसर, दगडवाडीसह अनेक गावात जोरदार पाऊस झाला नव्हता. पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात या भागात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे या गावांना पाणी पुरवठा करणा-या विहिरींना अद्यापही पाणी वाढले नाही. या भागातील २७ गावांना पाणी पुरवठा करणारी करंजी- मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरत आहे. या योजनेव्दारे एक-एक महिना पाणी पुरवठा होत नसल्याने ऐन दिवाळीच्या सणात या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या या संस्थेची चौकशी करुन ही संस्था बरखास्त करून योजना शासनाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी होत आहे. पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजी, मिरी, तिसगाव परिसरातील गावात नेहमीच पाणी टंचाई जाणवत असते. यामुळे या भागातील २७ गावांना मुळा धरणातून पाणी आणून पांढरी पुलावरील टाकीत पाणी सोडण्यात येते. तेथून या गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतू नियोजनाच्या अभावामुळे या योजनेला १-१ महिना पाणी येत नाही. पाणी येत नसल्याने  मागील आठवड्यात टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. 
संस्था बरखास्त करण्याची मागणी
पिण्याच्या पाण्याची योजना असूनही ऐन दिवाळीच्या सणाला करंजीसह अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागाला पाणी पुरवठा करणा-या संस्थेची चौकशी करून संस्था बरखास्त करावी, अशी मागणी प्रकाश शेलार, संदीप अकोलकर, मच्छिंद्र अकोलकर, राजेंद्र मरकड, राजेंद्र अकोलकर, बाबा मोरे, अशोक टेमकरसह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.
विद्युत मोटारी जळाल्या
 करंजी-मिरी-तिसगाव पाणी पुरवठा करणा-या योजनेच्या विद्युत मोटारी जळाल्या होत्या. आता त्या दुरुस्त करण्यात आल्या असून योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी सांगितले.    
दिवाळीत करंजीत पाणी टंचाई
 करंजी-मिरी-तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना एक महिन्यापासून बंद आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर करंजी परिसरातील अनेक गावात पाण्याची टंचाई निर्माण आहे. पाणी योजनेचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे ही संस्था बरखास्त करावी, असे ग्रामस्थ प्रकाश शेलार यांनी सांगितले. 
     

Web Title: The Karanji-Miri-Tisgaon water plan is ineffective; Drinking water scarcity in 3 villages in Ain Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.