शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

केडगावातल्या दोन शिवसैनिकांचं हत्या प्रकरण, काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 9:04 AM

केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर- केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. विशाल कोतकर हा हत्याकांडात संशयित मुख्य सूत्रधार असल्याचीही चर्चा आहे. आतापर्यंत या हत्याकांडात 9 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.तत्पूर्वी शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाला कारणीभूत ठरलेल्या रवी खोल्लम याला पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले होते. केडगाव येथे 7 एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व गुप्तीने वार करून हत्या झाली होती. घटनेनंतर रवी खोल्लम फरार झाला होता. केडगाव पोटनिवडणुकीत मतदानाच्या कारणावरून संजय कोतकर व खोल्लम यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर संजय कोतकर यांनी खोल्लमला धमकी दिल्याचं समोर आलं होतं.आरोपी संदीप गुंजाळ (मारेकरी), बाबासाहेब केदार, संदीप गि-हे व महावीर मोकळे यांची पोलीस कोठडी गुरुवारी न्यायालयाने 21 एप्रिलपर्यंत वाढवली. खोल्लमला 24 एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसेच या हत्याकांडप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर यांच्या कोठडीत दोन दिवसांची तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड