कामे केली पण कोट्यवधी अडकले:  शासकीय ठेकेदारांनी मांडली व्यथा   

By अरुण वाघमोडे | Published: February 15, 2024 08:23 PM2024-02-15T20:23:27+5:302024-02-15T20:24:03+5:30

बिल्डर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

Jobs done but crores stuck Government contractors woes | कामे केली पण कोट्यवधी अडकले:  शासकीय ठेकेदारांनी मांडली व्यथा   

कामे केली पण कोट्यवधी अडकले:  शासकीय ठेकेदारांनी मांडली व्यथा   

अहमदनगर: शासनाकडून मंजूर झालेले कामे पूर्ण केली मात्र, गेल्या दोन वर्षापासून कामाचे बिल अदा न झाल्याने अनेक ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. थकीत देयके तातडीने अदा करावेत, अशी मागणी बिल्डर असोसिएशनच्यावतीने गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे.

बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांची बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दीपक दरे, उपाध्यक्ष संजय गुंदेचा, सचिव उदय मुंढे, संतोष धुमाळ, आर.एन.रेपाळे, एम.व्ही. दराडे, पंकज वाघ, व्ही. व्ही.तवले, ए.पी.घुले, अमित तोरडमल, अमोल कदम, राहुल शिंदे, प्रीतम भंडारी, देविदास खरात, दादासाहेब थोरात यांनी भेट घेत ठेकेदारांची व्यथा मांडली. नगर जिल्ह्यातील शासकीय ठेकेदार यांची मागील २ वर्षापासून शासनाने पिळवणूक चालविलेली आहे. कुठलेही काम केले तर १० ते १५ टक्के पैसे येतात मात्र, कामाचे पूर्ण देयके वेळेत कधीच दिली जात नाहीत. त्यामुळे सर्व ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. कामामध्ये कोट्यवधी रुपये अडकल्याने बँकेचे कर्ज थकलेले आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा करत आहे. ५० वर्षाच्या काळामध्ये असे कधीही झाले नाही.  दीपावलीलाही ठेकेदारांना पैसे देण्यात आले नाही. ठेकेदार, लेबर, कर्मचारी यांनी २०२३ ची दिपावली साजरी केलेली नाही. याचे देखील प्रशासनाला कोणताही दुःख नाही. त्यामुळे जानेवारी २०२४ पर्यंतची ठेकेदारांची सर्व थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावीत तसेच निधी अभावी किंवा कमी निधी असेल अशा मुदत संपलेल्या सर्व कामांना आपल्या स्तरावर एकतर्फी मुदतवाढ द्यावी. थकित बिलाच्या रकमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ५० टक्के निधीची तरतूद असल्याशिवाय नवीन कामाच्या निविदा काढू नये तसेच कोणत्याही कामाच्या बिलाला विलंब झाल्यास ठेकेदाराला १२ टक्के व्याजासह बिल अदा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Jobs done but crores stuck Government contractors woes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.