Jito Pune through 'Kovid Center' again in public service! | जितो पुणे ‘कोविड सेंटर’च्या माध्यमातून पुन्हा जनसेवेत !

जितो पुणे ‘कोविड सेंटर’च्या माध्यमातून पुन्हा जनसेवेत !

‘जितो’चे सदस्य मनोज छाजेड, आदेश खिंवसरा, लखीचंद खिंवसरा यांनी डेक्कन भागातील रेव्हेन्यू कॉलनीतील हॉटेल स्पॅन एक्झिक्युटिव्ह येथे हे सेंटर सुरू करावे, असा प्रस्ताव ठेवला. जितो पदाधिकारी, नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर येथील नागरिकांनी या सेंटरला पाठिंबा दिला. येथील नागरिकांनी दाखविलेल्या माणुसकीमुळेच हे कोविड सेंटर सुरू झाले आहे. तेथे सोयीयुक्त ७५ बेड असलेले हे सेंटर सुरू करण्यात आले आहे, रुग्णांसाठी ए.सी., टी.व्ही. अशा सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम, ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन आदी सुविधादेखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सेंटरच्या उद्‌घाटनाला विजयकांत कोठारी, एस.के. जैन, राजेश सांकला, सी.ए. सुहास बोरा, इंदर जैन, इंद्रकुमार छाजेड, हेमंत रायसोनी, रमेश गांधी, राजेंद्र बाठिया, संदीप लुणावत, नरेंद्र छाजेड, डॉ. अनिल रांका, योगेश मोहोळ, डॉ. गजानन एकबोटे, संजय छाजेड, विनोद नाईक, लकिशा मरलेचा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘जितो’चे चीफ सेक्रेटरी पंकज कर्नावट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि शेवटी सर्वांचे आभार मानले. महापौर मुरलीधर मोहळ यांनी ‘जितो’च्या कार्याचे कौतुक करत समाजसेवी संस्थांनी ‘जितो’प्रमाणे वेळेला मदतीचे हात पुढे करावा, असे आवाहन केले. ॲड. अभय छाजेड, स्काय ब्रिझचे मनोज छाजेड यांनी रक्तदान व प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले. (वा.प्र.)

--

फोटो- ०७ जीतो फोटो

Web Title: Jito Pune through 'Kovid Center' again in public service!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.