Jawan Kashmir jawan martyred by Dahegaon Bolok in action | जम्मू काश्मिरमधील कारवाईत दहिगाव बोलकाचे जवान शहीद
जम्मू काश्मिरमधील कारवाईत दहिगाव बोलकाचे जवान शहीद

दहिगाव बोलका : येथील रहिवासी व सध्या भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असलेले सुनील रावसाहेब वलटे (वय ३८) हे जम्मू काश्मीरमधील नवशेरा सेक्टरमधील कारवाईत शहीद झाले आहेत.    
सुनील वलटे यांचे वडील रावसाहेब हे शेती करतात. तर आई गृहिणी आहे. सुनील यांचे शालेय शिक्षण दहिगाव बोलका येथील वीरभद्र विद्यालय व बारावीपर्यंत तर शिक्षण एस.एस.जी.एम महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर त्यांची कोपरगाव येथील सैनिक भरती केंद्रातील कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले. त्यानंतर ते भारतीय लष्करात सैनिक म्हणून भरती झाले. लष्करात भरती झाल्यावर ते २४ मराठा लाईफ इंन्फे्ड्रीमध्ये नायब सुभेदार पदावर त्यांची पदोन्नती झाली होती. २२ आॅक्टोबर रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात त्यांना गोळी लागली होती. त्यातच ते शहीद झाले आहेत. त्यांचे मागे पत्नी मंगल, एक मुलगा (वय १४), एक मुलगी (वय ६), वडील, आई, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: Jawan Kashmir jawan martyred by Dahegaon Bolok in action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.