शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
3
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
4
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
5
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
6
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
7
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
8
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
9
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
10
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
11
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
12
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
13
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
14
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
15
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
16
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
17
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
18
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
19
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
20
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे

जामखेड दुहेरी हत्याकांडातील आरोपींची तालीम सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 6:48 PM

जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम बंद करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी नगरपालिकेकडे केली होती.२८ एप्रिलला बीड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या ...

ठळक मुद्देजामखेड नगरपालिकेची कारवाईमृतांच्या नातेवाईकांनी केलेली मागणी

जामखेड :राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या तालमीस जामखेड नगरपालिकेने मंगळवारी सायंकाळी सील ठोकले. जांबवाडी रस्त्यावरील ही वादग्रस्त तालीम बंद करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी नगरपालिकेकडे केली होती.

२८ एप्रिलला बीड रस्त्यावरील एका हॉटेलसमोर मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्याकांडाचा थेट संबंध भुतवडा रस्त्यावरील अमरधामशेजारी असलेल्या या तालमीशी जोडण्यात आला. या तालमीत वास्तव्यास असलेला आरोपी गोविंद गायकवाड याने अल्पवयीन मुलासह इतर साथीदारांच्या मदतीने दुहेरी हत्याकांड केले होते. याच तालमीतून गुंड तयार करण्याचे काम होत असल्याचा आरोप झाल्यानंतर तालमीतून तलवारीदेखील जप्त करण्यात आल्या होत्या. ही तालीम नगरपालिकेने पाडावी अथवा ताब्यात घ्यावी, यासाठी मृतांच्या नातेवाईक व महिलांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. तसेच ३० एप्रिलच्या ग्रामसभेत व शांतता समितीच्या बैठकीत ही तालीम पाडण्याचा ठराव करण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेत नगरपालिकेने १४ मे च्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी तालमीस सील ठोकण्यात आले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड