साई उद्यानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:07+5:302021-03-06T04:21:07+5:30

.... तामिळनाडूचा गूळ नगरमध्ये अहमदनगर: तामिळनाडू येथील ताडी, या वृक्षापासून तयार करण्यात आलेला गूळ नगरमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे. ...

Inspection of Sai Udyan | साई उद्यानाची पाहणी

साई उद्यानाची पाहणी

Next

....

तामिळनाडूचा गूळ नगरमध्ये

अहमदनगर: तामिळनाडू येथील ताडी, या वृक्षापासून तयार करण्यात आलेला गूळ नगरमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे. औरंगाबाद महामार्गावर गुळाची विक्री सुरू असून, प्रवासी वाहने उभी करून हा गूळ खरेदी करत आहेत. हा गूळ सर्दी, खोकला आदी आजारांवर गुणकारी असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

....

विवरणपत्र सादर करण्याचा आदेश

अहमदनगर: महापालिका कर्मचाऱ्यांना येत्या ३१ मार्चपर्यंत मालमत्तेचे विवरणपत्र सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिलेल्या मुदतीत विवरणपत्र सादर न केल्यास मार्च महिन्याचे वेतन अदा केले जाणार नाही. तसा आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने नुकताच जारी केला आहे.

....

कंत्राटी कर्मचारी वेतनापासून वंचित

अहमदनगर: महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात विद्युत पंप सुरू करणे, दुरुस्ती, पाणी सोडणे, यासारख्या कामांसाठी अकरा महिन्यांच्या कराराने कर्मचारी घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतनच दिले गेले नाही. यावर कळस असा की काहींना मुदतवाढीचा आदेशही दिला नसल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. काहीजण शहर सोडून आपल्या गावी निघून गेल्याचे सांगण्यात आले.

....

घनकचरा विभागप्रमुखपदी शेडाळे

अहमदनगर: महापालिकेच्या घनकचरा विभागाचा प्रमुख नरसिंह पैठणकर हा लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात अडकल्यामुळे घनकचरा विभाग प्रमुख हे पद रिक्त होते. या पदावर वैद्यकीय अधिकारी शंकर शेडाळे यांची पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. घनकचरा विभागाचा पदभार वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. परंतु, त्यांनी घनकचरा विभागाचा कारभार पाहण्यास नकार दिल्यामुळे अखेर शेडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

.....

मेहत्रे यांचा पुन्हा राजीनामा

अहमदनगर: महापालिकेतील विद्युत विभागाचे प्रमुख राजेंद्र मेहत्रे यांनी पुन्हा रजेचा अर्ज सादर केला आहे. यापूर्वीही त्यांनी लॉकडाऊनच्या काळात रजेचा अर्ज दिला होता. विद्युत विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मेहत्रे यांनी राजीनामा सादर केला होता. परंतु, तो मंजूर केला गेला नाही. एक महिन्याच्या रजेवरून परतल्यानंतर त्यांच्याकडे विद्युत विभागाचा पदभार सोपविण्यात आला असून, त्यांनी दुसऱ्यांदा राजीनामा सादर केला.

.......

Web Title: Inspection of Sai Udyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.